एक्स्प्लोर

Eknath Shinde Maharashtra New CM : रिक्षाचालक, नगरसेवक ते मुख्यमंत्री; एकनाथ शिंदे यांचा धगधगता प्रवास 

Eknath Shinde Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांच्या या खेळीमुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळं वळण मिळाले आहे.

 Eknath Shinde Maharashtra New CM : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं. 

एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास थक्क करणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून बंड केले. त्यावेळी त्यांच्यावर अनेकांनी टिकास्त्र सोडले होते. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा करत मास्टर स्ट्रोक खेळला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या खेळीमुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळं वळण मिळाले आहे. संपूर्ण ठाकरे सरकारला वेठीस धरणारे एकनाथ शिंदे म्हणजे, कडवट शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते. आनंद दिघेंसोबत आपला राजकीय प्रवास सुरु करणारे एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचं काम एकनाथ शिंदेंनी एकहाती केलं. एक रिक्षाचालक आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे... पाहूयात... एकनाथ शिंदे यांचा प्रवास... 

एकनाथ संभाजी शिंदे
जन्म : ६ मार्च १९६४.
जन्म ठिकाण : अहिर, तालुका-महाबळेश्वर, जिल्हा-सातारा.
शिक्षण : बी.ए.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती लता. अपत्ये : एकूण 1 (एक मुलगा).
व्यवसाय : उद्योग व सामाजिक कार्य. पक्ष : शिवसेना.
मतदारसंघ : 147 -कोपरी-पाचपाखाडी, जिल्हा-ठाणे. 
भाजपच्या उमेदवाराला  89  हजार 300 मतांनी हरवून विजयी
शिंदे यांना पडलेली मतं - 1 लाख 13 हजार 495
भाजपच्या संजय घाडीगावकर यांना पडलेली मतं - 24 हजार 197

एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द :
1997 व 2002 दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.
2004, 2009,2014,2019 चार वेळा आमदार;
2014 ते 2019 विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते;
12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विधानसभा विरोधी पक्ष नेता,
5 डिसेंबर ते नोव्हेंबर 2019 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री; तसेच जानेवारी 2019 सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री;
ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते;
नोव्हेंबर 2019 पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री.

सुपरव्हायझर... रिक्षाचालक ते थेट नगरसेवक - 
सुरुवातीच्या काळात ते ठाण्याच्या प्रसिद्ध वागळे इस्टेटमधील एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कामाला होते. कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडत आत्मनिर्भर व्हायचं ठरवलं आणि ठाण्यात ऑटो रिक्षा चालवू लागले. काम करत असताना एकनाथ शिंदे यांच्या आयुष्याला दोन व्यक्तिंमुळे कलाटणी मिळाली. त्या व्यक्ती म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे.  वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षाच्या कामाला सुरुवात केली. पक्षाची कामं करताना शिंदेंना आनंद दिघेंचा सहवास लाभला आणि त्यांच्या प्रति विश्वास वाढू लागला. कालांतरानं एकनाथ शिंदे आनंद दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागलं. पक्षाप्रतिची निष्ठा पाहुन एकनाथ खडसेंना त्यांच्या कामाची पावती मिळालीच. 1984 साली वयाच्या विसाव्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यावर आनंद दिघेंनी जबाबदारी सोपवली. ठाण्याच्या किसन नगरचं शाखाप्रमुख पद त्यांना देण्यात आलं. इथूनच खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेंच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. 

इतर माहिती -
ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष; सन 1986 मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आंदोलनात 100 कार्यकर्त्यांसह सक्रीय सहभाग. 
40 दिवस बेल्लारी येथे तुरंगवास सहन केला; संपुर्ण ठाणे शहर व जिल्ह्यात सामाजिक कार्याचे जाळे निर्माण केले; ठाणे शहरात ओपन आर्ट गॅलरी, सचिन तेंडुलकर मिनी स्टेडियम, इंटरर्निटी सुविधा.
भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, शहिद हेंमत करकरे क्रीडा संकूल, जॉगिंग पार्क, सेंट्रल लायब्ररी सुरु केली; आदिवासी प्रभाग मोखाडा,
तलासरी व जव्हार येथील आश्रमशाळेत व आरोग्य केंद्रात सकस आहार व आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करुन गरीब रुग्णांना विनामुल्य
औषध वाटप केले; पालघर, बोईसर व सफाळे परिसरात शिवसेनेतर्फे एस.एस.सी. विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन; गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप; पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप;
वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन; बालनाट्य महोत्सवाचे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; ‘जाणता राजा’ नाटकाचे अत्यल्पदरात आयोजन; अध्यक्ष, ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन;
उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटना; पुरग्रस्तांना मदत; ठाणे
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व आधुनिकीकरणासाठी विशेष योगदान; एम एम आर डी सक्षम बनविण्यात यश; नागपूर - मुंबई समृध्दी महामार्ग,
वांद्रे- वरळी सी लिंक, वाशी येथील तिसरा खाडीपुल, मुंबई- पुणे द्रुतगती मार्गची क्षमता वाढविण्यासाठी खालपूर- लोणावळा टेनल मार्ग, शिळ कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण, विदर्भात रेल्वेच्या २७ उड्डाणपूलाचे
काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न; राज्यातील द्रुतगती मार्गावरील उपधान कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या; ओझर्डे येथे ट्रामा केअर सेंटर सुरू केले; आरोग्य मंत्री पदाच्या काळात आशा सेविकांची पगार वाढ केली;
आदिवासी व दुर्गम भागात काम करणाऱ्या बी.ए, एम.एस. पदवी धारक कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला;
ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा पुर्नविकास केला; ठाणे मेट्रोचा कामाला गती दिली; ठाणे- मुलुंड दरम्यान नव्या स्थानकाला मुंजूरी मिळविली; ठाणे जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या काळू धरणाच्या
अडचणी सोडविण्यात यश; बारवी धरणाची उंची वाढविण्यासाठी मंजूरी मिळविली; एम एम आस डी ला क्लस्टर योजना सुरू केली; ठाणे जिल्हा परिषद, तसेच कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर, महानगर पालिकेत
व अंबरनाथ, बदलापूर नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता आणण्यात यश; १९८४ शिवसेना शाखा प्रमुख, वागळे इस्टेट, किसननगर; शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख; पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग,

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget