Eknath Shinde : आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
Eknath Shinde : आपला मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. तर दुसरा मेळावा हा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केला.

Eknath Shinde : आपला मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. तर दुसरा मेळावा हा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे असे म्हणत सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केला. हिंदुत्वाचा भगवा आपल्याकडे आहे. शिवधनुष्य आपल्याकडे आहे आणि जनतेचा आशिर्वाद देखील आपल्याकडे आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. आपल्या पक्षात जी वाढ होतेय ही सर्वांच्या मेहनीची आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण याचेच हे प्रतिबिंब असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही आम्ही तडजोड करणार नाही
बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसचा विरोध केला. मात्र या लोकांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे काम केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्राचा विश्वासघात केल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली. मुख्यमंत्रीपदासाठी झाले लाचार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही आम्ही तडजोड करणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. हिंदुत्वाची आम्ही कधी प्रतारणा करणार नाही वचन आम्ही दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. काही लोकांना निवडणुका आल्यावर कार्यकर्त्यांची आठवण येते. एरव्ही हम दो हमारे दो असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली.
बाळासाहेबानंतर तुम्ही मराठी माणसांसाठी काय केले? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
बाळासाहेबानंतर तुम्ही मराठी माणसांसाठी काय केले? याचा हिशोब द्या असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सवाल केला. आता म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही मग बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राटतुम्ही का म्हणत नाही असा सवाल देखील एकनाथ शिंदे यांनी केला. हिंदुत्व आमचा श्वास आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले कमॉन कील मी पण मी म्हणतो मेलेल्या माणसाला काय मारणार. महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत तुमचा मुडदा पाडलेला आहे अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. वाघाच कातडं पांघरुन लांडगा वाघ होत नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यासाठी वाघाचा काळीज आणि मनगटात जोर लागतो असे एकनाथ शिंदे म्हणाले. तो दम शिवसैनिकात आहे. आमच्या नादाला तुम्ही लागू नका. तुमचा चांगा पलटी घोडं फरार आम्ही केलं आहे. बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा सच्चा कार्यकर्ता मी असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही आम्हाला अभिमान
पाकड्यांनी आपल्या निष्पाप पर्यटकांचे बळी घेतले. त्यानंतर आम्ही त्यांच्या कुटुंबियाचे सात्वंन करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तुम्ही कुठे गेला होतात असा सवालही ठाकरे गटाला एकनाथ शिंदे यांनी केला. 20 मिनीटात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. कितीही हामले झाले तरी या देशाचे पंतप्रधान म्हणाले ईट का जवाब गोली से देंगे असे एकनाथ शिंदे म्हणाले. आपल्या लष्करी सेनेबद्दल आम्हाला अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही आम्हाला अभिमान असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेब असते तर त्यांनी देखील मोदींना शाबासकी दिली असलती असेही एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधक भारतीय लष्कराच्या कार्यक्षमतेवर संशय घेत आहेत. आपल्या लष्करावर अविश्वास दाखवणे हा देशद्रोह असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. पण आपल्या सैन्यानी दहशतवादाचे अड्डे उध्वस्थ केले, सामान्य लोकांवर कुठेही हल्ला केला नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले.
राहुल गांधी पाकिस्तानात हिरो मात्र भारतात झिरो
पाकिस्तानात राहुल गांधी व्हायरल होत आहेत. भारताविरोधात बोलून पाकिस्तानात हिरो झाला पण भारतात तुम्ही झिरो झालात अशी टीका एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडण्याचे काम भारताच्या शिष्टमंडळाने जगभरात केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. एका शिष्टमंडळाचे नेतृत्व श्रीकांत शिंदे यांनी करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेनेचे दोन खासदार जगभरात भारताचे नेतृत्व करता ही छोटी गोष्ट नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मोदीजींनी श्रीकांत शिंदेंना नाव दिले आहे भाऊ. हे श्रीकांतचे श्रेय नाहीतर सगळ्या शिवसैनिकांचे असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मोदीजींना मी मनापासून आभार मानतो. त्यांनी दोन खासदारांना शिष्टमंडळात संधी दिली. एनडीएमध्ये आपल्या शिवसेनेचे किती महत्वाचे स्थान आहे मोदीजींनी अधोरेखीत केल असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी श्रीकांत शिंदे यांना म्हणत होतो की तुझ्या बापाने चालू सरकार पाडलं आहे. तू भीवू नको असे मी सांगत होतो असे एकनाथ शिंदे म्हणाले. मी डॉक्टर नसलो तरी मोठमोठे ऑपरेशन करुन टाकतो असे एकनाथ शिंदे म्हणाले. आर आर पाटील गृहमंत्री असताना सभेत माझ्याबद्दल आणि श्रीकांतबद्दल बोलले होते. श्रीकांत हाडे जोडण्याचे काम करतो असे एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाचा जीव हा मुंबई महापालिकेच्या तिजोरीत आहे
कुठे पैसे खायचे हे कळत नाही. मिठी नदीचे पैसे देखील खाल्ले. पण मिठी नदीच्या मगमिठीतून तुम्ही सुटणार नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. दिनीची चौकशी सुर आहे. दिनुने तोंड उघडल्यावर कळेल काय होईल असेएकनाथ शिंदे म्हणाले. सामान्य माणसांची मी नाळ कधीही तुटू देणार नाही. मुंबईबाहेर फेकलेल्या मराठी माणसांना पुन्हा परत आणायचे आहे. गोरगरिबांसाठी घरे द्यायची असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचा जीव हा मुंबई महापालिकेच्या तिजोरीत आहे अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. तुम्हाला मुंबईचा लढा आता आठवला. सत्तेत असता तुम्हीच तिजोरी फोडल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली. लढा देण्यासाठी आधी घराबाहेर तर पडा असेही एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि राहिल. कुणाचा बाप जरी आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही. मुंबईचे महत्व कधीही कमी होणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढच्या दीड ते दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त होणार
सगळे प्रकल्प आम्ही मार्गी लावले आहेत. पुन्हा विकासाला चालना दिली असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईचे सगळे रस्ते कॉंक्रीटचे करा असे मी आणि देवेंद्रजींनी सांगितल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. पुढच्या दीड ते दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त होणार असे एकनाथ शिंदे म्हणाले. लोकांना खड्ड्यात घालण्याचे, त्यांना मारण्याचे पाप तुम्ही केल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर केली. नवी मुंबईचे एअरपोर्ट झालं आहे. वाडवनला मोठं विमानतळ झालं आहे. हा सगळा विकास आपण करत आहोत असे एकनाथ शिंदे म्हणाले. गेल्या तीन वर्षात खूप मोठी कामे केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईचे महत्व वाढल्याशिवाय राहणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले आपण स्थगिती सरकार बदलून काम करणारं सरकार आणल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. न होणारे काम नियमात बसवून करायला स्कील लागते असे अधिकारी आम्हाला पाहिजेत असे एकनाथ शिंदे म्हणाले.
कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही. मुख्यमंत्री सहायत्ता निधीच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री असताना 360 कोटींचा निधी दिल्याचे एकनाथ शिंद म्हणाले. कमीत कमी वेळेत जास्त काम करण्याचा विक्रम महाविकास आघाडीने केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. देशाचे पंतप्रधझान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा आम्हाला खंबीर पाठिंबा होता. कामातून आम्हा जनतेचे प्रेम मिळवल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 232 जागा विधानसभेत आपल्याला मिळाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन हे अभियान सुरु
सासरच्या छळाला कंटाळून पुण्यात एका मुलीने आत्महत्या केली. आपल्या सुनांना लेकीसारखे वागण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे. त्यासाठी आपण आज लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन हे अभियान सुरु केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. प्रत्येक घरातील लाडकी सून ही एकनाथ शिंदेची लाडकी बहिण आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. यापुढे शिवसनेच्या शाखा तुमचं माहेर असणार आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. पिडीत महिलांच्या रक्षणासाठी शिवसेनेच्या महालि रणरागिणी धावून जातील असे एकनाथ शिंदे म्हणाले. हे अभियान आपण धर्मवीर आनंद दिघे आश्रमातून करत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आनंद दिघेंनी त्यांच्या कार्यकाळात जिथं अन्याय झाला तिथं जशास तसा लढा दिला. इथून पुढे विकास विकास आणि वाकस हाच आपला अजेंडा असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. येणाऱ्या निवडणुकीत विजयची हॅट्रीक होणार आहे. शिवसेना दररोज वाढत आहे. अनेकांचे पक्षप्रवेश होत आहे. मुंबईचे उबाठाचे विद्यमान 50 नगरसेवक शिवसेनेत आले. पुढे काय होणार हे आता मी सांगत नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. दुसऱ्या पक्षाचे देखील 15 ते 17 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत असे एकनाथ शिंदे म्हणाले. निवडणुका महायुतीत लढायच्या आहेत. याबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ असेहीएकनाथ शिंदे म्हणाले. जेवढी नोंदणी जास्त तेवढा पक्ष मोठा होईल. पक्ष मोठा झाला तर तुम्ही मोठे व्हाल असेही एकनाथ शिंदे म्हणाले. सण जोरात साजरे करा, हिंदुत्वाचा जयजयकार करा. कार्यकर्ते तयार करा, नेते तयार होती. समोर बसलेली आमची संपत्ती आहे. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. येणारी प्रत्येक निवडणुक आपल्याला जिंकायची आहे. आता मिशन एकच पालिकेवर जिल्हा परिषदेवर पंचायत समित्यांवर भगवा आणि ग्रामपंचायत्यांवरही भगवा असे एकनाथ शिंदे म्हणाले. चला उठा व्हा सज्ज मुंबईवरही आता भगव्याचेच राज्य असे एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
'कम ऑन किल मी' म्हणणाऱ्यांचा मुडदा महाराष्ट्राने आधीच पाडलाय, मेलेल्यांना कोण मारणार? एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
























