एक्स्प्लोर

ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा; मुंबईतून एकनाथ शिंदेंची बोचरी टीका, शहाजी बापूंवरही कौतुकाचा वर्षाव

लोकशाही मध्ये सगळ्यांना युती आघाडी करण्याचा अधिकार आहे. पण काही युत्या आघाड्या या फक्त खुर्ची आणि सत्तेसाठी केल्या जातात असे म्हणत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Eknath Shinde : लोकशाही मध्ये सगळ्यांना युती आघाडी करण्याचा अधिकार आहे. पण काही युत्या आघाड्या या फक्त खुर्ची आणि सत्तेसाठी केल्या जातात असे म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्या युतीवर टीका केली. आमची युती विकास आणि जनतेसाठी आहे. पण काही लोक स्वत:च्या फायद्यासाठी करत आहेत. पण मुंबई आणि इतर महापालिकांमध्ये फक्त महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

मुंबई बाहेर गेलेल्या मुंबईकरांना आम्ही पुन्हा परत आणणार 

मराठी माणूस सुज्ञ आहे या मराठी माणसाला मुंबई बाहेर हाकलण्याचं काम कोणी केले? सा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. मुंबई बाहेर गेलेल्या मुंबईकरांना आम्ही पुन्हा परत आणणार आहोत. 20 हजार कोटींच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. लोकांना हक्काचे घर मिळण्याचा निर्णय आम्ही केला आहे. पण लोकांना बेघर करण्याचे काम यांनी केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईकर आमच्या सरकारच्या मागे उभा राहील असा विश्वसा देखील  एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पुन्हा मुंबईकरांना मुंबईत आणण्याचे काम करणार आहे. आम्ही मुंबईत सिमेंट चे रस्ते करणार मुंबई खड्डे मुक्त करणार मुंबईला प्रदूषण मुक्त करणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 

काही लोकांचा अजेंडा फक्त आरोपाचा प्रत्यारोपाचा टोमण्याचा

महाराष्ट्रातील तमाम मतदारांचे मी आभार मानतो.  मी माझ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत जिद्दीने कष्टाने ही निवडणूक पार पडली मी सगळ्यांचे आभार मानतो असे एकनाथ शिंदे म्हणाले. ऐतिहासिक असा विजय शिवसेनेला मिळवून दिला आहे. चांदा ते बांदा प्रत्येक रिझर्व मध्ये घराघरात शिवसेना पोहोचवण्याचं काम माझ्या शिवसैनिकांनी केलं. प्रत्येक विभागामध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले. हजारोंच्या संख्येने नगरसेवक निवडून आले आहेत. हा ऐतिहासिक विजय आहे. ऐतिहासिक विजय आम्ही बाळासाहेबांच्या चरणी शिवतीर्थावर अभिवादन केलं.बाळासाहेबांच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन जात आहोत. मी अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं ते लोकांसमोर आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आमचा झेंडा विकासाचा आहे डेव्हलपमेंटचा आहे काही लोकांचा अजेंडा फक्त आरोपाचा प्रत्यारोपाचा टोमण्याचा आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. लोकांनी काम करण्याचा साथ दिली आणि आरोपांना घरी बसवलं. महाविकास आघाडीने पराभव या निवडणुकीमध्ये मान्य केला होता. म्हणून ते कुठेही कार्यकर्त्यांच्या पाठीशी नव्हते त्यांनी वाऱ्यावर कार्यकर्ते सोडले होते असे शिंदे म्हणाले.

शहाजीबापूंनी चक्रव्यूह भेदून सगळ्यांना आडवं करून टाकलं 

जिथे आमदार नाही तिथेही आपले नगराध्यक्ष निवडून आले आहेत.  62 पेक्षा जास्त नगराध्यक्ष आपले निवडून आले आहेत. 70 पेक्षा जास्त नगराध्यक्ष हे आपल्याला मिळाले आहेत. कमी जागा लढवून आपण जास्त जागा मिळवल्या आहेत. आपला विधानसभेला जसा स्ट्राइक रेट होता तसा स्ट्राईक रेट या निवडणुकीत देखील पाहायला मिळाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. प्रचंड जल्लोष उत्साह जनतेमध्ये यावेळी पाहायला मिळाला. शहाजी बापूंना सगळ्यांनी चक्रव्युहात पकडलं होतं. पण चक्रव्यूह भेदून सगळ्यांना आडवं करून टाकलं शहाजी बापू एकदम ओके आहेत असे कौतुक देखील एकनाथ शिंदे यांनी केले.

असली आणि नकली कोण आहे हे जनतेच्या न्यायालयाने दाखवून दिले

लोकांनी देखील त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना वारंवार बसवलं घरी बसवलं. देशामध्ये इंडियाचं सरकार आहे राज्यामध्ये इंडियाचं सरकार आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये देखील एनडीएला भरघोस मतदान मिळालेला आहे. महाविकास आघाडीची स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये बेरीज पकडली तर एकट्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त आहे. असली आणि नकली कोण आहे हे जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेने दाखवून दिला आहे. असली आणि नकलीवर कोण बोलतील हे मला वाटत नाही. ज्या ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आले त्या ठिकाणी त्यांना विकास करणे मूलभूत सुविधा देणे भरघोस निधी देणे हा शिवसेनेचा अजेंडा असणार आहे. आता शिवसेनेची जबाबदारी वाढलेली आहे मूलभूत सुविधा देण्याचं काम शिवसेनेचा आहे महायुतीचा आहे ते देण्याचे काम आम्ही करणार आहोत. नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसेल. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. 

ठाकरे बंधुंच्या युतीची उद्या 12 वाजता घोषणा होणार

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधुंच्या युतीच्या घोषणेचा अखेर मुहूर्त ठरला असून उद्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात बैठक झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. या दोन्ही नेत्यांकडून उद्या दुपारी ठाकरे बंधूंच्या युती आणि जागावाटपाची घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे, मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-मनसे एकत्र आल्याने ठाकरेंची ताकद वाढली आहे. 

शिवसेना आणि मनसेची युती कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहेत. कोणाच्या मनात संभ्रम नाही. तशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. एकत्र येऊन सर्व कामाला लागले आहेत. मनोमिलन झालेलं असून जागावाटपवर काल रात्री शेवटचा हात फिरवला गेला, असं संजय राऊतांनी सांगितलं होतं. युती झालेली आहे, केवळ जागावाटपासंदर्भातली घोषणा बाकी आहे. आमच्यात जागावाटपावरून कोणताही विसंवाद नाही. वरळीमधील डोमममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युती झाली, असंही संजय राऊत म्हटलं. त्यानुसार, आता ट्विट करुन संजय राऊत यांनी युतीच्या घोषणेचा मुहूर्त सांगितला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !

Embed widget