माझं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर प्रहार, म्हणाले, गळती थांबवण्यासाठी कुठं कुठं ठिगळ लावणार
माझ्यावर आरोप करताना विचार करा. माझं नाव घेतल्या शिवाय त्यांना झोप लागत नाही. मला हलक्यात घेतलं पण मी हलका नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Eknath Shinde on Uddhav Thackeray : माझ्यावर आरोप करताना विचार करा. माझं नाव घेतल्या शिवाय त्यांना झोप लागत नाही. मला हलक्यात घेतलं पण मी हलका नाही. त्यामुळं तुमचं तक्त पालटल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर (Uddhav thackeray) टीका केली. गळती थांबवण्यासाठी कुठं कुठं ठिगळ लावणार असा टोला देखील शिंदेंनी लगावला. मी म्हणालो 200 पार करणार, पण तुम्ही 100 लढून 20 जिंकले. आम्ही 60 लढून 50 जिंकल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत संघर्ष करणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला
जगात एकच असा नेता आहे की लोक सोडून गेल्यावर आनंद व्यक्त करत आहे असा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. कार्यकर्ते घडवायला खूप वेळ लागतो, पण गमवायला वेळ लागत नाही. आता निवडणूक आहे. कार्यकर्ता हाच आपला पाया आहे. पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. म्हणून नेत्यांनी कार्यकर्त्यांकडे पाहावं असे एकनाथ शिंदे म्हणाले.
सरकार येणार म्हणून विरोधकांनी मंत्रिमंडळ बनवले पण लाडक्या बहिणीने सर्वांना झोपवले
लाडकी बहीण योजना यशस्वी होणार नाही, असे अनेक लोक म्हणाले होते. पण ही योजना आणली तो एकनाथ शिंदे आहे. सरकार येणार म्हणून विरोधकांनी मंत्रिमंडळ बनवले होते पण लाडक्या बहिणीने सर्वांना झोपवले असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. सत्ता येते जाते पण नाव जाता कामा नये. म्हणून लडकी बहीण योजना यशस्वी झाल्याचे शिंदे म्हणाले. मी हुशार आहे आचारसंहितेच्या काळातील पैसे आधीच बहिणीच्या खात्यात टाकले होता. माझ्या कामाचा उल्लेख बाळासाहेबांनी केला होता याचा आम्हाला अभिमान असल्याचे शिंदे म्हणाले. आम्ही खुर्चीसाठी भांडणार नाही. खुर्चीसाठी कोण भांडले ते तुम्हाला माहीत आहे. सोन्याचा चमचा घेवून जरी जन्म झाला नसला तरी येथील लोकांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न करीत होतो.
2022 साली त्यांना बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवले म्हणून आम्ही उठाव केला
कोरोना काळात आम्ही किट घालून फिरत होतो. कोविडटे संकट भयंकर होते, आपले परके झाले होते. पण मी कार्यकर्ता आहे आणि राहणार असल्याचे शिंदे म्हणाले. 2022 साली बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवण्याचे काम केले म्हणून आम्ही उठाव केला. हा संघर्ष मुख्यमंत्री बनण्यासाठी नव्हता असे एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीचे ताट भरले होते आणि त्यांनी काँग्रेसचे ताट घेतले. आम्ही मंत्रिपद सोडून गेलो. आम्ही सत्ता सोडून गेलो. जगातील एकमेव गोष्ट असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीला आतापर्यंत 234 जागा कधी मिळाल्या नव्हत्या पण महाराष्ट्रात इतिहास घडवल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
आनंद दिघे हे घराघरात फिरले आहेत. पालघर जिल्ह्यात शिवसैनिक हा जीवाला जीव देणारा आहे. आपत्ती येते तेव्हा आपण धावतो. मी मुख्यमंत्री असतानाही इर्शाळवाडीची दुर्घटना झाली तेव्हा मी तिथे गेलो. मला जाऊ नका असे म्हणत होते, पण मी एसपींच्या गाडीत इर्शाळवाडीत पोहोचल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आपली माणसं ज्या परिस्थिती काम करीत होती, हाताने माती उपसत होती, नातेवाईकांचा अक्रोश सुरु सुरु होता. फार वाईट परिस्थिती होती अससे एकनाथ शिंदे म्हणाले. मी गेल्यामुळे लोकांना धीर आला्याचे ते म्हणाले. आतंकवाद आणि दहशतवादाला धर्म नसतो. पण मालेगावचा आतंकवाद झाला तिथं लोक म्हणाले हा भगवा दहशतवाद आहे. प्रज्ञासिंग ठाकूर यांना टॉर्चर केले. मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नावे घेण्यास सांगितले. ज्यांनी पोलसांवर दबाव टाकला त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे असे एकनाथ शिंदे म्हणाले.
भगवा उतरु न देण्यासाठी संघर्ष करायचाय
लोकसभेची निवडणूक होती, त्यावेळी आई हॉस्पिटलमध्ये होती. त्यावेळी डॉक्टरांनी मला फोन केला. पण मी तरीही निवडणूक सभा केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. माझ्या आईला मी जिवंतपणी पाहू शकलो नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. हा भगवा झेंडा लक्षात ठेवा. भगवा उतरु न देण्यासाठी संघर्ष करायचा असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. पालघरमध्ये अनेक निवडणूक अतितटीच्या लढवल्या जिंकल्या आहेत. आपल्या पक्षात कार्यकर्ते आहेत. हा जिल्हा बालेकिल्ला सर करायचा आहे. गड सर करायला सरनाईक येतील. पालघरकडून शब्द द्या आपणाकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बाकी चिंता करु नका महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे असे एकनाथ शिंदे म्हणाले. पालघरच्या सर्व निवडणुकीत एकनाथ शिंदे तुमच्यासोबत उभा आहे. कोणतीही निवडणूक अवघड नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
























