एक्स्प्लोर

अठराव्या शतकातील कुलूप, अमरावतीच्या अचलपूरमधील कुटुंबाकडे दुर्मिळ वस्तूंचा खजिना

अमरावती : अचलपूर येथील झंवर कुटुंबाने जपलेले अठराव्या शतकातील 'हाय सिक्युरिटी लॉक' म्हणजे कुलूप अनेकांना चकमा देणारं आहे. अठराव्या शतकातील हे लॉक लोखंडाचे असून याला सहज उघडता येत नाही.

अमरावती : कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात घरफोड्या दरोडे आणि चोऱ्या वाढल्याचे समोर येत आहे. भुरट्या चोरांनी आधुनिक तंत्रज्ञानाला सुद्धा चकवा देत आपल्या चोरीच्या कौशल्याचा विकास केल्याचं दिसत आहे. मात्र, अमरावतीच्या अचलपूर येथील झंवर कुटुंबाने जपलेले अठराव्या शतकातील 'हाय सिक्युरिटी लॉक' म्हणजे कुलूप अनेकांना चकमा देणारं आहे. अठराव्या शतकातील हे लॉक लोखंडाचे असून याला सहज उघडता येत नाही. याला उघडण्यासाठी अनेकांची बुद्धीसुद्धा पणाला लागते. लॉक उघडण्यासाठी एक दोन नव्हे तर चक्क चार चाव्यांचा वापर करावा लागतो.

अठराव्या शतकातील 'हाय सिक्युरिटी लॉक'

अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे गोपालदास झंवर आणि ब्रिजमोहन झंवर या दोन बंधूंनी हे अठराव्या शतकातील एक आगळं वेगळं आणि विश्वास बसणार नाही असं लॉक जपून ठेवले आहे. पेशाने कास्तकार (शेतकरी) असणाऱ्या या झंवर कुटुंबीयांनी अनेक दुर्मिळ आणि पुरातन वस्तूंचे संग्रह केला आहे. यात हाय सिक्युरिटी लॉक, वाळूचा उपयोग करून तयार केलेली स्टॉप वॉच, बांबूचा उपयोग करून तयार केलेली ज्वेलरी बॉक्स अशा अनेक गोष्टी अनेकांना भुरळ घालणारे आहे. सध्या वाढत्या चोरीचा काळ पाहता हे लॉक अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय बनला आहे.

झंवर कुटुंबाकडे दुर्मिळ वस्तूंचा खजिना
या चार चावीच्या कुलुपाशिवाय गोपाल झंवर यांच्याकडे इतर तीन कुलूप देखील आहेत. जी अतिशय पुरातन आणि विशेष आहेत. त्यासोबतच पाच मिनिटे आणि एक तास इतका वेळ चालणारी वाळूचे घड्याळं देखील झंवर यांनी जतन करून ठेवले आहे. आजही ह्या सर्व वस्तू अगदी सुस्थितीत असून त्यामध्ये कुठलाही बिघाड आला नसल्याचं गोपाल झंवर यांनी सांगितलं.

अचलपूरचा इतिहास
निजामाची राजधानी असलेले अचलपूर पूर्वीचे जैनधर्मीयांच्या काळातील अलयपूर, निजाम राजवटीतील एलीचपूर ऐतिहासिक शहराला जवळपास 5 किमी परिघाचा परकोट म्हणजे संरक्षक भिंत आहे. त्याला 6 महाद्वार आहे. परकोटाला असलेल्या दरवाजाचा मूळ उद्देश शत्रूपासुन संरक्षण करणे हा दुय्यम उद्देश असून या संरक्षक भिंतीमुळे पूर्वी वर्‍हाडातील ऐलीचपुर ही सोने, मोती, हिरे यांची मुख्य बाजारपेठ असल्याने कडक सुरक्षा असायची. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
Nancy Tyagi Indian Fashion Influencer Cannes 2024 : भारतीय रील स्टारची 'कान्स'मध्ये हवा; स्वत: तयार केलेल्या ड्रेसने दिली दिग्गजांना टक्कर
भारतीय रील स्टारची 'कान्स'मध्ये हवा; स्वत: तयार केलेल्या ड्रेसने दिली दिग्गजांना टक्कर
Raju Shetti : कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी यासाठी आदेश द्या; राजू शेट्टींची मागणी
कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी यासाठी आदेश द्या; राजू शेट्टींची मागणी
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही : योगी आदित्यनाथUddhav Thackeray on Mulund : कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना आमची सत्ता आल्यावर पाहून घेऊAaditya Thackeray Slams Eknath Shinde : नकली शिवसेनेला महाराष्ट्राची जनता उत्तर देईलHemant Godse Nashik : 100 % आमचा विजय निश्चित,हेमंत गोडसेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
Nancy Tyagi Indian Fashion Influencer Cannes 2024 : भारतीय रील स्टारची 'कान्स'मध्ये हवा; स्वत: तयार केलेल्या ड्रेसने दिली दिग्गजांना टक्कर
भारतीय रील स्टारची 'कान्स'मध्ये हवा; स्वत: तयार केलेल्या ड्रेसने दिली दिग्गजांना टक्कर
Raju Shetti : कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी यासाठी आदेश द्या; राजू शेट्टींची मागणी
कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी यासाठी आदेश द्या; राजू शेट्टींची मागणी
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Actor Chandrakanth Death :  धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
Kiran Mane :  मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
Monsoon Update : आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
Embed widget