(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ram Rahim Singh : पंजाब निवडणुकीच्या तोंडावर राम रहीम तुरुंगाबाहेर, 21 दिवसांची सुट्टी मंजूर
Ram Rahim Singh : पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरमीत राम रहीम सिंह (Gurmit Ram Rahim Singh) तुरुंगाबााहेर आला आहे. त्याला 21 दिवसांची सुट्टी मंजूर करण्यात आली आहे.
Ram Rahim Singh : पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरमीत राम रहीम सिंह (Gurmit Ram Rahim Singh) तुरुंगाबााहेर आला आहे. त्याला 21 दिवसांची सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. राम रहीमचे 69 मतदारसंघात प्राबल्य आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी गुरमीत राम रहीमची सुटका ही एक महत्त्वाची घटना मानली जात आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पंजाबमधील अनेक विधानसभा जागांवर डेरा सिरसाचा प्रभाव आहे. सिरसा डेरा येथे राम रहीमला पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. राम रहीम तुरुंगाबाहेर पडण्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी कारागृहाभोवती पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
राम रहीमला ऑगस्ट 2017 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड आणि रणजीत हत्या प्रकरणातही त्याला दोषी ठरवण्यात आले. तुरुंगाच्या नियमांनुसार, कोणताही कैदी पॅरोल किंवा सुट्टी घेऊ शकतो. कायदा आणि सुव्यवस्था किंवा अन्य हरकती पाहून शासन आणि जिल्हा प्रशासनाला या संबंधित निर्णय घ्यावा लागतो. अलीकडेच राम रहीमने तुरुंग प्रशासनाकडे 21 दिवसांची रजा मागितली होती. कारागृह प्रशासनाने शासनाकडे अर्ज पाठवला होता. यानंतर सोमवारी राम रहीमला सुट्टी मंजूर झाली आहे.
राम रहीम वर्षभरात पाच वेळा तुरुंगातून बाहेर आला
12 मे 2021 : राम रहीमला रक्तदाब आणि अस्वस्थतेची तक्रार. त्यामुळे त्यांना पीजीआयमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले.
17 मे 2021 : राम रहीमला त्याच्या आईला भेटण्यासाठी एक दिवसाचा पॅरोल मंजूर झाला. त्याला पोलीस संरक्षणात गुरुग्रामला नेण्यात आले.
03 जून 2021 : राम रहीमने पोटदुखीची तक्रार केली, त्यामुळे त्याला पीजीआयमध्ये आणण्यात आले.
08 जून 2021 : राम रहीमला गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात नेण्यात आले. पीजीआय रोहतकमध्ये राम रहीमच्या आरोग्य चाचण्या होऊ शकत नाहीत, असा युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे त्याला गुरुग्रामला न्यावे लागले.
09 ऑगस्ट 2021 : राम रहीमला दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवले.
राम रहीमला 21 दिवसांची सुट्टी मंजूर करण्यात आली असून आता लेखी आदेशाची प्रतिक्षा आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- अपघातग्रस्ताला रुग्णालयात दाखल केल्यास मिळणार बक्षिस, 'या' शहरात वाहतूक पोलिसांचा नवा उपक्रम
- Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये 28 मतदारसंघाची पुनर्रचना, 'या' ठिकाणी वाढणार जागा ; पुनर्रचना आयोगाचा प्रस्ताव
- UP Election 2022: पंतप्रधान मोदी प्रचारासाठी रणांगणात, उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये आज सभा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha