एक्स्प्लोर

धक्कादायक! नेवासामध्ये एकाच वेळी आठ दुकाने जळून खाक, मोबाईल शॉपसह बॅग हाऊस कोल्ड्रिंक्स शॉपचं मोठं नुकसान 

नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात मेन रोडवरील आठ दुकाने जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने शहरात खळबळ उडाली आहे.

Ahilyanagar Nevasa Fire News : नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात मेन रोडवरील आठ दुकाने जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने शहरात खळबळ उडाली आहे. सलून, मोबाईल शॉप, बॅग हाऊस, प्रसाधनालय, कोल्ड्रिंक्स शॉप, गॅस शेगडी रिपेरिंग, केक शॉप व किड्स वेअर दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, याप्रकरणाचा तपास सुरु आहे. 

परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात मदत कार्यासाठी धावून 

परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात मदतकार्यासाठी धावून आले आहेत. नेवासा नगरपंचायत व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस प्रशासनातर्फे गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, अचानक आग लागल्यामुळं परसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, ही आग नेमकी कशामुळं लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, या आगीत एकूण आठ दुकाने जळून खाक झाली आहेत. यामुळं व्यवसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच घटनास्थळी अग्नीशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, आग मोठ्या प्रमाणात लागली आहे. 

कुर्लामध्ये गॅस वाहिनी फुटून आग लागली

कुरल्याच्या विनोबा भावे नगर मध्ये मुबारक इमारत जवळ एमजीएल गॅस वाहिनी फुटून आग लागली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यात आजूबाजूची तीन चार दुकाने जळून खाक झाली. या ठिकाणी पालिकेची मलनिसारण वाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू होते. या खोदकामासाठी वापरण्यात येत असलेल्या जेसीबी चा फटका बसून ही गैस वाहिनी फुटून आग लागली.आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या होत्या. त्यांनी काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवले यामुळे मोठी हानी टळली आहे.

परभणीच्या डॉक्टर लाईन भागात मध्यरात्री नंतर भीषण आग 

परभणीच्या डॉक्टर लाईन भागात मध्यरात्री नंतर भीषण आग लागली होती. या भागातील एका होजीअरीच्या दुकानाला ही आग लागली होती. आग एवढी प्रचंड होती की या आगीने दुकानासह गोदामातील संपूर्ण कपड्याच्या मालाने पेट घेतला. शिवाय आसपासच्या दुकानात ही आग पसरली होती. परभणी शहरातील अग्निशमन विभागाच्या दोन बंबासह तालुक्यातील बंब ही मागवण्यात आले होते. स्वतः जिल्हाधिकारी, संजय सिंह चव्हाण पोलीस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी खासदार संजय जाधव मनपा उपयुक्त यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत उपाययोजना केल्या. डॉक्टर लाईन भागातील इमारतीत ही आग असल्याने तत्काळ प्रशासन सतर्क झाले वेळीच या भागाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला त्याच बरोबर ज्या दुकानाला आग लागली त्याच्या वरच्या मजल्यावरील राहत असलेल्या नागरिकांना ही बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कुठलीही जीवितहाणी झाली नाही. तीन तासांच्या अथक प्रयत्ननंतर ही आग आटोक्यात आली. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली ही कळू शकले नाही.

महत्वाच्या बातम्या:

Jalgaon Accident: जळगावात भीषण अपघात; टायर फुटून कार दुभाजकावर आदळली अन् क्षणार्धात पेटली, महिलेचा होरपळून मृत्यू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
Embed widget