एक्स्प्लोर
वर्ध्यात आढळलं दुर्मिळ हाडफोडी गिधाड!
वर्धा : वर्ध्यात बहार नेचर फाऊंडेशनला पक्षी अभ्यास दौऱ्यादरम्यान दुर्मिळ गिधाड आढळला. याला इजिप्शियन व्हल्चर, हाडफोडी तसेच सर्वाशनी गिधाड म्हणून ओळखलं जातं. हे दुर्मिळ गिधाड तब्बल नऊ वर्षांनी दिसून आलं.
PHOTO : वर्ध्यात आढळलं दुर्मिळ हाडफोडी गिधाड!
गिधाडांची संख्या कमी होत असल्याची एकीकडे परिस्थिती आहे. त्यामुळे वर्ध्यात असा दुर्मिळ गिधाड आढळल्याने पक्षी मित्रांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
PHOTO : वर्ध्यात आढळलं दुर्मिळ हाडफोडी गिधाड!
मातकट रंगाचा हा गिधाड इतर अन्य गिधाडांपेक्षा आकराने लहान असतो. याची चोच आणि डोळे पांढरे किंवा पिवळे असतात. हा गिधाड युरोप, अमेरिका, आफ्रिकेतील देशांमध्ये आढळून येतात. पक्षी अभ्यासकांच्या माहितीनुसार, ही प्रजात हाड फोडण्यात पटाईत असते.
PHOTO : वर्ध्यात आढळलं दुर्मिळ हाडफोडी गिधाड!
निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळख असणारी गिधाड प्रजाती नष्ट होत चालली आहे. इंटरनशॅनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर संकटग्रस्त पक्षी म्हणून घोषित केलं आहे. अशा प्रजातींना पर्यावरणाचं चक्र चालविण्यासाठी संरक्षणाची गरज असल्याच मत प्राणी मित्रांकडून व्यक्त केल जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement