एक्स्प्लोर

जादा शुल्क घेणाऱ्या शाळांवर कारवाई करणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा

लॉकडाऊनमुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे शाळांनी जादा फी आकारू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

हिंगोली : लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातचं आता शाळा सुरू झाल्यावर मुलांची फी कशी भरायची असा प्रश्न सर्वसामान्य पालकांच्या समोर उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना दिलासा देणारा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. खासगी शाळांनी जादा शुल्क आकारल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा शिक्षण मंत्र्यांनी दिलाय. शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्या बोलत होत्या.

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील क्वॉरंटाईन सेंटरची पाहणी केली. तसेच खरीप हंगाम सन 2020-21मध्ये बांधावर शेतकरी गटामार्फत खते, बियाणे औषधांचे वाटप केले. पालकमंत्री या वेळी एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या, की ज्या खाजगी शाळा पालकांकडून ज्यादा शुल्क आकारतील अशा शाळांवरती कार्यवाही करू. त्याचबरोबर दरवर्षी शैक्षणिक वर्ष 15 जूनला होतं. याही वर्षी 15 जूनलाच शाळा सुरू करण्याचा मानस आहे. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता यावर पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर खासगी शाळांनी शुल्क वाढवू नये, पालकांना सोयीचे पडेल तशा पद्धतीने टप्प्यांमध्ये शाळांनी पालकाकडून शुल्क घ्यावे, अशी सूचना देखील त्यांनी केली. कारण यावर्षी कोरोणामुळे पालकांची परिस्थिती नाजूक असल्याने शाळांनी हा निर्णय असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात अडकलेल्या लोकांना गावी परतण्यासाठी एसटीची मोफत सेवा : अनिल परब

दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता कोरोना व्हायरसमुळे दहावीचा एक पेपर रद्द करण्यात आला. मात्र, अद्याप पेपर तपासणीला सुरुवात करण्यात आली नाही. परिणाणी दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शिक्षकांना घरी पेपर तपासण्यासाठी देण्यात यावेत, अशी सूचना पुढे आली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी पेपर पोहचवण्या अडचणी येऊ शकतात, त्यामुळे अद्यापतरी पेपर हे बोर्डातचं पडून आहेत.

Minister Anil Parab on ST Bus Service | एसटीतर्फे बससेवा मोफत : परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget