एक्स्प्लोर

विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेणार : वर्षा गायकवाड

 दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी दोन दिवसांत बैठक घेणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

मुंबई : सीबीएसई बारावीच्या परीक्षेसंदर्भात व व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरीक्षांबाबत आज केंद्र आणि राज्यातील मंत्र्याची उच्चस्तरीय बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, प्रकाश जावडेकर यांच्यासोबतच राज्यांचे शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. बैठकीनंतर, 'विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असेल आणि तिच प्राथमिकता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून परीक्षांसंदर्भातील निर्णय लवकरच घेऊ' , अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 

विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.  दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी दोन दिवसांत बैठक घेणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शिवाय, उच्चस्तरीय बैठकीमध्ये  बारावी सीबीएसई परीक्षेबाबत निर्णय घेताना जर या परीक्षा पुढील महिन्यात घेण्याबाबत विचार असेल तर पुढील महिन्यात राज्यातील कोरोना परस्थिती पाहून परीक्षाबाबत विचार राज्यांना करावा लागेल. यामध्ये बारावीचे विद्यार्थी मागील दीड वर्षांपासून अभ्यास करत असताना त्यांच्या मानसिकता विचारात घेऊन सुद्धा निर्णय घ्यावा लागेल. कारण परीक्षेबाबत विद्यार्थी खूप संभ्रमात आहे, त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन याबाबत निर्णय घ्यावा लागेल. शिवाय, विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत सुद्धा पुढाकार घेतला जावा, असं मत वर्षा गायकवाड यांनी बैठकीत मांडलं. राज्य मंडळाच्या दहावी बारावी परीक्षेबाबत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय लवकरच घेतला जाईल, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले.

राज्य मंडळाच्या दहावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्षण विभाग ठाम?
 
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत आम्ही उच्च न्यायालयासमोर आमची भूमिका मांडणार आहोत. तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक आहे. अंतर्गत मुल्यमापन अशी मागणी होतेय पण आम्ही कोर्टात सर्व म्हणणं मांडू. दहावीच्या मुलांचं नुकसान होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. याबाबत राज्य सरकार लवकरच शासन निर्णय जाहीर करून तो हायकोर्टासमोर ठेवू. असाधारण परिस्थितीत न्यायालय सुद्धा या सर्वाचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल अशी अपेक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. मुलांचं अॅडमिशन वेळेवर व्हावं असे प्रयत्न करत आहोत. एका आठवड्यात चित्र स्पष्ट होईल, अशी आशा आहे. मुलांचं हित समोर ठेवून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat: 'स्पॉट व्हिजिट'साठी 5 लाख घ्यायचा, अमावस्या-पौर्णिमेला भक्तांच्या भल्यामोठ्या रांगा, भोंदूबाबाला अलिशान गाड्यांचाही शौक; अशोक खरातच्या 'व्हीआयपी' दरबाराचा पर्दाफाश
'स्पॉट व्हिजिट'साठी 5 लाख घ्यायचा, अमावस्या-पौर्णिमेला भक्तांच्या भल्यामोठ्या रांगा, भोंदूबाबाला अलिशान गाड्यांचाही शौक; अशोक खरातच्या 'व्हीआयपी' दरबाराचा पर्दाफाश
Rupali Chakankar Ashok Kharat Case Nashik Crime News: काल टाळलं, आज हजर राहणार?; अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलवताच रुपाली चाकणकर म्हणाल्या...
काल टाळलं, आज हजर राहणार?; अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलवताच रुपाली चाकणकर म्हणाल्या...
Beed Crime: बीडमध्ये प्रेम प्रकरणाचा थरारक शेवट, मुलीच्या घरच्यांकडून बेदम मारहाण; छळामुळे तरुणाने चिठ्ठी लिहून गळ्याला लावला दोर
बीडमध्ये प्रेम प्रकरणाचा थरारक शेवट, मुलीच्या घरच्यांकडून बेदम मारहाण; छळामुळे तरुणाने चिठ्ठी लिहून गळ्याला लावला दोर
NCP: राष्ट्रवादी काँग्रेसचा 'कणा'च नव्या संविधानातून गायब?, ओबीसी अन् अल्पसंख्याक सेल वगळल्याने खळबळ, 7 ऐवजी आता फक्त 4 फ्रंटल सेल
राष्ट्रवादी काँग्रेसचा 'कणा'च नव्या संविधानातून गायब?, ओबीसी अन् अल्पसंख्याक सेल वगळल्याने खळबळ, 7 ऐवजी आता फक्त 4 फ्रंटल सेल

व्हिडीओ

Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Ashok Kharat: भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...
भक्तांच्या घरी जाण्यासाठी अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर.
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Embed widget