एक्स्प्लोर

विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय झाल्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला : शिक्षणमंत्री उदय सामंत

राज्य सरकारने अंतिम वर्षातील अंतिम सत्राबद्दल घेतलेल्या निर्णयावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी टीका केली. यावर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सिंधुदुर्ग : राज्य सरकारने अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परिक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरुन आता पुन्हा राजकारण सुरू झाले आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी बॅकलॉग व एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले का? असा प्रश्न विचारत राज्यातील विद्यार्थ्यांचा एकत्रित एकसुत्री निर्णय नसून हे शैक्षणिक आरोग्य बिघडवण्याचे पाप असल्याचा आरोप केलाय. तर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय झाल्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे, असे म्हणत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय.

राज्य सरकारने व्यवसायिक अभ्यासक्रम, बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम हा पहिला टप्पा आणि एटीकेटीचा दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यात निर्णय घेतले आहेत. व्यवसायिक अभ्यासक्रम परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये झालेला आहे. त्याला मान्यता अभ्यास बॉडीने द्यावा असा निर्णय घेतला आहे. बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यांना पदवी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मार्क वाढवायचे असल्यास त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा द्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले असल्याचे सामंत यांनी सांगितले.

राज्यातील 3 लाख 41 हजार 308 एटीकेटी आणि बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांबाबतीत स्पष्ट धोरण आहे. सगळ्या कुलगुरूंशी येत्या दोन-तीन दिवस मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करून निर्णय जाहीर करू, अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

बॅकलॉग व ATKT च्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले? विद्यार्थ्यांसोबत ही तर 'हेराफेरी' : आशिष शेलार

मुख्यमंत्र्यांनी सरासरी गुणांवर ठरवू अशी, घोषणा केली होती. आता त्यातून माघार घेऊन "योग्य सूत्र" विद्यापीठांनी ठरवा सांगून गोंधळ वाढवला, असा आरोप विरोधकांनी केलाय. त्यावर याबाबत गेले पाच वर्षे विरोधक सत्तेत असताना त्यांना विद्यार्थ्यांची काळजी वाटली नाही का? विद्यार्थ्यांच्या विषयी केव्हा ते बोलले नाहीत. दुर्दैवाने जे जे निर्णय घेतले त्यातील 65 जी आर मागे घेतले. आम्ही कुठलाही जी आर अजून मागे घेतलेला नाही. मागे घेण्याचा प्रश्न येत नाही. मुख्यमंत्री विद्यार्थ्यांकडे सक्षम व काळजी पोटी बघतायेत. त्याची प्रचिती पालकांना आणि विद्यार्थ्यांना आलेली असल्याचे ते म्हणाले.

विरोधकांच्या प्रत्येक टीकेला उत्तर द्यायला बंधनकारक समजत नाही : सामंत कृषी विद्यापीठांनी 'आपापले' वेगळे सूत्र ठरवले तर राज्यातल्या राज्यात गोंधळ निर्माण होईल, असाही विरोधकांचा आरोप आहे. विरोधक विद्यार्थ्यांमध्ये नाहक संभ्रम निर्माण करत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतायेत. विरोधकांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देणे मी मंत्री म्हणून बंधनकारक समजत नाही. विरोधकांनी टीका करत रहावी, आम्ही आमचं काम करत राहू, असे उत्तर शिक्षणमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नाला दिले.

म्हणून विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठलाय विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा विद्यार्थ्यांची आम्हाला काळजी आहे. हेच विद्यार्थी भविष्यामध्ये धडा शिकवतील. प्रतिज्ञापत्रात असा कुठेही उल्लेख नाही. त्यांना भिंगाच्या चष्म्यातून व्यवस्थित वाचायला सांगा. लेखी स्वरूपाने कळवावे, असे आहे. अनेक असे सोर्स आपल्याकडे आहेत त्यातून लेखी विद्यार्थी विद्यापीठांना कळवू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय झालाय. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय झाल्यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे, असेही सामंत म्हणाले.

Maharashtra Exam | राज्यपालांचा विरोध असतानाही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Embed widget