एक्स्प्लोर

बॅकलॉग व ATKT च्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले? विद्यार्थ्यांसोबत ही तर 'हेराफेरी' : आशिष शेलार

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज अंतिम वर्षातील परीक्षांबाबत निर्णय जाहीर केला. या निर्णयावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी टीका केली आहे. या निर्णयात बॅकलॉग व ATKT च्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांनी केलाय.

मुंबई : अंतिम वर्ष अंतिम सत्र परिक्षेबाबात आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाइव्हद्वारे निर्णय जाहीर केला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी या निर्णयाबाबत महत्वाचे प्रश्न निर्माण केले आहेत. या निर्णयात बॅकलॉग व एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले का? असा प्रश्न विचारत राज्यातील विद्यार्थ्यांचा एकत्रित एकसुत्री निर्णय नसून हे शैक्षणिक आरोग्य बिघडवण्याचे पाप असून आमची भिती खरी ठरली आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांसोबत "हेराफेरीच" केली, अशा शब्दांत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शासनाच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेत ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

पदवी अंतिम वर्षाबाबत गेले अनेक दिवस या विषयाचा पाठपुरावा करणाऱ्या माजी शिक्षणमंत्री आमदार आशिष शेलार यांनी आज शासन निर्णय जारी झाल्यानंतर त्यावर जोरदार टीका केली. प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी केली, हे योग्यच आहे. पण शैक्षणिक आयुष्यात मात्र गोंधळात गोधळ वाढवला आहे. बॅकलॉक व एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले? एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा होणार? त्यांचा निर्णय सरकार घेणार नाही? हा तर पळपुटेपणा आहे. मुख्यमंत्र्यांनी सरासरी गुणांवर निकाल ठरवू अशी, घोषणा केली होती आणि आता त्यातून माघार घेऊन "योग्य सूत्र" विद्यापीठांनी ठरवा सांगून गोंधळ वाढवला आहे. विद्यापीठांना सूत्र ठरवायला अमर्याद वेळ दिली, मग तुम्ही कसला निर्णय घेतला? असा सवाल त्यांनी विचार आहे.

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्दच; एटीकेटीबाबत दोन दिवसात निर्णय : शिक्षणमंत्री उदय सामंत

राज्यातल्या राज्यात गोंधळ निर्माण होईल : शेलार  राज्यात 11 कृषी विद्यापीठांनी आपापले वेगळे सूत्र ठरवले तर राज्यातल्या राज्यात गोंधळ निर्माण होईल. मग हे विद्यार्थी देशात स्पर्धेत कसे टिकणार? प्रतिज्ञापत्र द्यायची अट टाकली कसे देणार? प्रत्यक्ष? की ऑनलाइन? मग निसर्ग चक्रीवादळामुळे जिथे वीज नाही, त्यांनी काय करायचे? व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांबाबत काहीच निर्णय नाही. त्यामुळे त्याचे भवितव्य अधांतरीच ठेवण्यात आले आहे. एकुणच राज्यातील विद्यार्थ्यांचा एकत्रित एकसुत्री निर्णय नाही. हे "शैक्षणिक आरोग्य बिघडवण्याचे" पाप असून अखेर आमची भिती खरी ठरली, राज्य सरकारने विद्यार्थ्यांसोबत "हेराफेरीच" केली आहे, अशा शब्दांत त्यांनी या निर्णयावर टीका केली आहे.

दरम्यान, पदवी परिक्षांबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आमदार आशिष शेलार यांनी पहिल्या दिवसापासून सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरु केला होता. प्रथम मुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री यांना पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. तसेच तातडीने राज्यपालांची ही भेट घेतली होती.

MPSC Results | राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, सातारचा प्रसाद चौगुले अव्वल!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
बांगलादेशी बाबू आयनल, घुसखोरी करत कोट्यवधींची माया जमवली अन् मुंबई पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी मुसक्या आवळल्या, पण जामिनावर सुटताच अल्पवयीन मुलाला किन्नर करत..
बांगलादेशी बाबू आयनल, घुसखोरी करत कोट्यवधींची माया जमवली अन् मुंबई पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी मुसक्या आवळल्या, पण जामिनावर सुटताच अल्पवयीन मुलाला किन्नर करत..
Uddhav Thackeray on Baramati Bypoll: 'बारामती'साठी सुनेत्रा पवारांची मातोश्रीवर फोनाफोनी, काँग्रेस सुद्धा मैदानात; दुहेरी कोंडीत उद्धव ठाकरेंचं काय ठरलं? अखेर निर्णय समोर!
'बारामती'साठी सुनेत्रा पवारांची मातोश्रीवर फोनाफोनी, काँग्रेस सुद्धा मैदानात; दुहेरी कोंडीत उद्धव ठाकरेंचं काय ठरलं? अखेर निर्णय समोर!
Sushma Andhare: अंजली दमानियांनी बाहेर काढलेल्या खरातच्या सीडीआरमध्ये भाजपचा एकही माणूस कसा नाही? काहीतरी गडबड वाटते: सुषमा अंधारे
दमानियांनी बाहेर काढलेल्या खरातच्या सीडीआरमध्ये भाजपचा एकही माणूस कसा नाही? काहीतरी गडबड वाटते: सुषमा अंधारे

व्हिडीओ

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?
Ashok Kharat Nashik : सुशिक्षित महिला भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? पिडीत महिलेचा थरारक खुलासा!
Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Bichukale : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
Strait of Hormuz: गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
Sunetra Pawar: 'पटेल न पटेल' पण पक्षातंर्गत 'तट'बंदी मोडून काढत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून सगळ्यांचाच करेक्ट कार्यक्रम! प्रफुल पटेलांचा 'समकक्ष' ताबाही निकालात
'पटेल न पटेल' पण पक्षातंर्गत 'तट'बंदी मोडून काढत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून सगळ्यांचाच करेक्ट कार्यक्रम! प्रफुल पटेलांचा 'समकक्ष' ताबाही निकालात
बांगलादेशी बाबू आयनल, घुसखोरी करत कोट्यवधींची माया जमवली अन् मुंबई पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी मुसक्या आवळल्या, पण जामिनावर सुटताच अल्पवयीन मुलाला किन्नर करत..
बांगलादेशी बाबू आयनल, घुसखोरी करत कोट्यवधींची माया जमवली अन् मुंबई पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी मुसक्या आवळल्या, पण जामिनावर सुटताच अल्पवयीन मुलाला किन्नर करत..
सातारा झेडपीत 'खाकी'च्या धाकात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडल्यानंतर सभापती निवडीतही वादाचा अध्याय; भाजपची पुन्हा फोडाफोडी, राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा बहिष्कार, पालकमंत्री म्हणाले, 'आगे आगे देखो होता है क्या'

संतापजनक... पिंपरीत 7 वर्षीय चिमुकलीवर दोनवेळा अत्याचार, आईने खिडकीतून बघितल्याने उलगडलं, नराधमास अटक
संतापजनक... पिंपरीत 7 वर्षीय चिमुकलीवर दोनवेळा अत्याचार, आईने खिडकीतून बघितल्याने उलगडलं, नराधमास अटक
Embed widget