एक्स्प्लोर
शालेय पोषण आहाराची रिकामी पोती विकून हिशेब द्या!
शालेय पोषण आहाराची रिकामी पोतीही आता शिक्षकांना विकावं लागणार असून त्याचा सर्व हिशेब शिक्षण खात्याला द्यावा लागणार आहे.
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या कामात आणखी भर पडली आहे. शालेय पोषण आहाराचं रिकामं पोतंही आता शिक्षकांना विकावं लागणार आहे. पोती विकल्यानंतर त्याचा सर्व हिशेबही शिक्षण खात्याला द्यावा लागणार आहे.
सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शालेय पोषण आहारासाठी पोत्यांमधून प्रत्येक शाळांमध्ये तांदूळ आणि इतर शालेय पोषण आहार दिला जातो. मात्र रिकामी झालेली पोती तशीच पडून राहतात, पोत्यांचा वापर वैयक्तिक कामासाठी होतो, किंवा ग्रामस्थ आणि शिक्षक ती विकून परस्पर पैसे लाटतात. यामुळे शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला आहे.
अनेक पोत्यांचा वापर शिक्षक शाळेसाठी किंवा वैयक्तिक कामांसाठी करतात, असा उल्लेख या निर्णयाचं पत्रक जारी करताना सरकारने केला आहे. रिकामी पोती विकल्यानंतर चलनाद्वारे जमा झालेला पैसा राज्य सरकारकडे भरायचा आहे.
प्राथमिकदृष्टया हा निर्णय योग्य वाटत असला तरी व्यावहारिक पातळीवर त्याची पूर्तता करताना शिक्षकांची मात्र दमछाक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्ञानदानाशिवाय इतर वेळखाऊ कामं गळ्यात पडल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement