एक्स्प्लोर

ED ची धडक कारवाई, एकट्या महाराष्ट्रात वर्षभरात 2167 कोटींची संपत्ती जप्त

गेल्या वर्षभरात ED ने धडक कारवाई करत महाराष्ट्रात राजकारणी आणि उद्योगपतींवर धाडी टाकल्या. जाणून घेऊयात त्या संबंधित सविस्तर माहिती...

मुंबई: ईडीनं महाराष्ट्रात रासपचे माजी आमदार रत्नाकर गुट्टे यांची 255 कोटी रुपयांची संपत्ती ताब्यात घेतली आहे. जप्तीची कारवाई त्यांच्यावर डिसेंबर 2020 मध्येच झाली होती. त्यात आता  635 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात ईडीनं हे पुढचं कडक पाऊल टाकलंय. गेल्या वर्षभरात एकट्या महाराष्ट्रातच ईडीनं इतक्या धडक कारवाया केल्यात की यातल्या जप्तीचा आकडा पाहिल्यानंतर कुणीही थक्क होईल.  एकट्या महाराष्ट्रात ईडीनं गेल्या वर्षभरात ज्या धडक कारवाया केल्यात त्यात तब्बल 2167 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केलीय.

ईडीचा फेरा आला की राजकारण्यांना धडकी भरते, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. ईडी अर्थात एन्फोर्समरेंट डिरेक्टोरेट, मराठीत अंमलबजावणी संचालनालय. नाव थोडसं किचकट वाटत असलं तरी ही संस्था आणि तिचं काम आता सर्वांना चांगलंच माहिती झालंय.

तब्बल 2167 कोटी, तेही केवळ महाराष्ट्रात. प्रताप सरनाईक, एकनाथ खडसे, अनिल देशमुख यांच्यासारख्या अनेक नेत्यांच्या संपत्तीचा यात समावेश आहे. तर पीएमसी बँक घोटाळा, एचडीआयएल, डीएचएफएल अशी काही कॉर्पोरेट उद्योगातली नावंही यात आहेत.

गेल्या वर्षभरात ईडीच्या काही प्रमुख कारवायांवर नजर टाकूया

ईडीकडून एकट्या महाराष्ट्रात 2167 कोटी संपत्ती गेल्या वर्षभरात जप्त

  • ईडीनं रत्नाकर गुट्टे यांच्या जप्त संपत्तीचा मंगळवारी ताबा घेतला. डिसेंबर 2020 मध्ये ही कारवाई करण्यात आली होती.  त्यांच्यावर 635 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याचा आरोप आहे. जवळपास 255 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. 
  • 27 ऑगस्ट 21- एकनाथ खडसे यांची 5.73 कोटी रुपयांची संपत्ती जप्त, यात 4.86 कोटी रुपयांची अचल संपत्ती आणि 86.28 लाख रुपयांच्या बँक बँलन्सचा समावेश. लोकप्रतिनिधींच्या गुन्हेगारी वर्तनाचं प्रकरण.
  • 17 ऑगस्ट 21- माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांची 234 कोटी रुपयांची संपत्ती जप्त, बँक घोटाळा प्रकरणात कर्नाळा नागरी सहकारी बँकशी संबंधित.
  • 16 जुलै 21- भ्रष्टाचार प्रकरणात अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती जप्त.
  • 2 जुलै 21- जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणात 65 कोटी रुपयांची संपत्ती जप्त, यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आणि त्यांच्या काही जवळच्या व्यक्तीच्या सहभागाचाही आरोप आहे.
  • 26 नोव्हेंबर 21- भावना गवळी- यांचे कथित सहकारी सईद खान यांची दक्षिण मुंबईतली 3.75 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली ईडीनं. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे एक संचालक सईद खान आणि भावना गवळी यांचे सहकारी. या प्रतिष्ठानमधून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप.
  • 10 जानेवारी 2021 मागच्या वर्षी जानेवारीत  प्रताप सरनाईक यांचे 112 प्लॉट जप्त केलेत. टिटवाळ्यातले नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड 5600 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप.

ही झाली केवळ राजकीय नावं. याशिवाय काहींवर ईडीच्या चौकशीची वक्रदृष्टी वळली आहे. त्यात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचंही नाव आहे. 980 कोटी रुपयांच्या सिटी को ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात चौकशी सुरु आहे. या प्रकरणात ईडीविरोधात अडसूळ वरच्या कोर्टात गेलेत.

ईडीप्रमाणेच काही केसेसमध्ये आयकर खात्यानंही स्वतंत्र कारवाया करुन संपत्ती जप्त केली आहे. नोव्हेंबर 2021 मधे आयकर खात्यानं पुणे, मुंबई, दिल्ली गोवा इथं छापे टाकत जवळपास 1400 कोटी रुपयांची संपत्ती केली होती. यात अजित पवारांशी निगडीत काही संपत्ती असल्याचीही चर्चा होती. राष्ट्रवादीकडून मात्र हे आरोप फेटाळले गेले होते. 

ईडीच्या कारवाया बँक घोटाळे आणि कॉर्पोरेट क्षेत्रातही. एकट्या महाराष्ट्रातल्याच या कारवाया पाहा.

  • 11 नोव्हेंबर 21- नागपूरमधल्या एम्प्रेस मॉल, 483 कोटी रुपयांच्या संपत्तीचा ताबा, बँक फ्रॉड, तायल ग्रुप ऑफ कंपनीज.
  • 28  सप्टेंबर वाधवान ग्लोबल कॅपिटलची 578 कोटी रुपयांची संपत्ती जप्त. कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या डीएचएफएल-यूपीपीसीएल फ्रॉड केसमध्ये.
  • 2 सप्टेंबर 21- पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात 233 कोटी रुपयांचे प्रेफरेन्शियल शेअर एचडीआयएल ग्रुपचे जप्त केलेत.
  • 27 मे 21- Varron ग्रुप ची 166 रुपयांची संपत्ती जप्त, मुंबई, पुणे, रत्नागिरी बँक फ्रॉड प्रकरणात.
  • 17 मार्च 21- फक्त राठी, बॉक्स सिनेमा आणि महा मूव्ही यांची टीआरपी स्कॅममध्ये 32 कोटी रुपयांची बँक खाती गोठवली.
  • 8 मार्च 21- अनिल भोसले यांच्यासह चौघांना अटक, शिवाजी भोसले सहकारी बँक घोटाळ्याचं प्रकरण.
  • 1 जानेवारी 21- प्रविण राऊत यांची 72 कोटी रुपयांची संपत्ती जप्त, पीएमसी बँक घोटाळा.

ईडी मधल्या या कारवाया बहुतांश पीएमएलए अँक्टशी संबंधित आहेत. 2002 मध्ये हा कायदा आला आणि नंतर यूपीएच्या काळात ईडीला अधिक अधिकार मिळाले. पण आता ईडी ही एक राजकीय अस्त्र बनल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतो. गेल्या काही दिवसातल्या या कारवायांचा वेग थक्क करणारा आहे. यातली किती न्यायालयात शेवटपर्यंत टिकतात यावर ईडीची गुणवत्ता मोजायला हवी. 

महत्त्वाच्या बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget