एक्स्प्लोर

वाढीव वीजबिलामुळे अमरावतीतल्या शेतमजूराची आत्महत्या

अमरावती जिल्ह्यात महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका शेतमजूराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अंजनगाव सुर्जी येथीलमहादेव पाटील यांच्या घरातील वीजबिल चक्क 20 हजार रुपये आल्याने त्यांनी रविवार (दि. 23 जुलै रोजी) विष पिऊन आत्महत्या केली.

अमरावती : महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका सामान्य माणसाला नेहमीच बसतो. पण अमरावती जिल्ह्यात महावितरणच्या याच गलथान कारभारामुळे एका शेतमजूराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अंजनगाव सुर्जी येथील शेतात घाम गाळून पोट भरणाऱ्या महादेव पाटील यांच्या घरातील वीजबिल चक्क 20 हजार रुपये आल्याने पाटील यांनी रविवार (दि. 23 जुलै रोजी) विष पिऊन आत्महत्या केली. वास्तविक, महादेव पाटील यांच्या कौलारु घरात कामापुरते दोन लाईट आहेत. मात्र गेल्या 4-5 महीन्यांपासून सतत 10 हजारापेक्षा जास्त वीजबिल येत होते. जानेवारी महिन्यात तर चक्क त्यांना 20 हजाराचे वीजबिल आले. या प्रकारामुळे पाटील नेहमी चिडचिड होत होती. वाढीव वीजबिलामुळे नौराश्येने ग्रासलेल्या पाटील यांनी 23 जुलै रोजी स्वत:ला संपवल्याचं कुटुंबीयाचं म्हणण आहे. पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत. आत्महत्येचा अन् वाढीव बिलाचा काहीही संबध नसल्याचा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. भारनियमनमुक्त महाराष्ट्र मोहीमेअंतर्गत राज्यातील सुमारे 33 लाख शेतकऱ्यांना  वाढीव वीजबिल पाठवल्याचं प्रकरण नुकतच समोर आलं होतं. लातुरच्या परिमंडळ कार्यालायातील वाणिज्य शाखेचे माजी ज्युनिअर मॅनेजर दिवाकर उरणे यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं होतं. या प्रकरणाची दखल घेऊन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणकडून वाढीव बिल पाठवलं असेल, तर ते आम्ही परत करु, असं अश्वासन दिलं होतं. पण याच वाढीव बिलामुळे एका शेतमजूराला आपला जीव गमवावा लागल्याचं समोर आलं आहे. संबंधित बातम्या

विजेचं वाढीव बिल पाठवलं असेल, तर ते आम्ही परत करु : ऊर्जामंत्री

भारनियमनमुक्त महाराष्ट्रासाठी 33 लाख शेतकऱ्यांच्या नावे वाढीव बिलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमकTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM :  ABP MajhaABP Majha Headlines :  10:00AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Maratha Kunbi Records: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
मोठी बातमी: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Mumbai Rains : मुंबईत जोरदार पावसाचं कमबॅक कधी?  समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
मुंबईत पाऊस कधी वेग पकडणार? समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
Embed widget