एक्स्प्लोर

लोकसहभागाला नाम फाऊंडेशनचं बळ, दुष्काळी आटपाडी तालुका पाणीदार

लोकसहभागातून आणि नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून कॅनॉलची झालेली कामे यासाठी उपयोगी ठरली आहेत. ज्यामुळे 20 गावांना मोठा फायदा झाला आहे.

सांगली : दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याचं चित्र बदलतंय. आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील नेहमी दुष्काळी असणारी 20 गावे आज पाणीदार झाली आहेत. लोकसहभागातून आणि नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून कॅनॉलची झालेली कामे यासाठी उपयोगी ठरली आहेत. लोकसहभागाला नाम फाऊंडेशनचं बळ, दुष्काळी आटपाडी तालुका पाणीदार 2013 साली आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी आले होते. मात्र या गावापर्यंत निधीअभावी या योजनेचे पाणी पोहचले नव्हते. मात्र लोकांनी सरकारच्या पैशाच्या मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून टेंभू योजनेतून पोट कालवा काढण्याची योजना आखली, ज्याला नाम फाऊंडेशनच्या कामाची देखील साथ मिळाली. आज या लोकसहभागातून झालेल्या कामाने नेहमी दुष्काळाच्या झळात जगणाऱ्या या 20 गावातील लोकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. लोकसहभागाला नाम फाऊंडेशनचं बळ, दुष्काळी आटपाडी तालुका पाणीदार आटपाडी तालुका म्हटलं की दुष्काळी भाग, पाण्याविना बनलेले ओसाड माळरान हे चित्र उभे राहते. पण हे चित्र देखील बदलण्याची किमया आता साध्य होऊ लागली आहे. आटपाडी तालुक्यातील पश्चिमेकडील 20 गावात, जिथे प्यायला पाणी मिळायचे नाही त्या ठिकाणी ऊसासारखी पिके घेतली जात असल्याचे चित्र आज पाहायला मिळत आहे. लोकसहभागाला नाम फाऊंडेशनचं बळ, दुष्काळी आटपाडी तालुका पाणीदार लोकसहभागातून जवळपास 15-20 किमी काढलेल्या कॅनॉलमधून खानापूर, आटपाडी या दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या टेंभू योजनेचे पाणी आज या गावाच्या शेता-शेतात पोहोचलं आहे. त्यामुळे गावात असणारा एक ना एक बंधारा काठोकाठ भरलेला दिसतो. शिवाय नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून या बंधाऱ्यातील गाळ काढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे जिथे कुसळे देखील उगवत नव्हती, त्या भागात आज हिरवाई पसरलेली आणि शेती बहरलेली दिसून येते. लोकसहभागाला नाम फाऊंडेशनचं बळ, दुष्काळी आटपाडी तालुका पाणीदार पाण्याच्या कमतरतेमुळे आजपर्यंत या भागातील लोक शेतीकडे न वळता पूर्णवेळ मेंढपाळ करणे किंवा शहरात जाऊन कामधंदा शोधणे हीच कामे करत होते. काही गावातील लोक तर ऊस तोडीसाठी देखील कृष्णा नदी काठी येत असत. टेंभू उपसा सिंचन प्रकलपाचे पाणी या भागात जरी आले असले तरी या गावापर्यंत पाणी न पोहोचल्याने त्या पाण्याचा फायदा होत नव्हता. त्यामुळे खरसुंडीजवळ आलेल्या टेंभू उपसा सिंचन प्रकलपाच्या कालव्यातूनच लोकसहभागातून पोट कालवा काढण्याची कल्पना सुचली आणि काम सुरू झाले. लोकसहभागाला नाम फाऊंडेशनचं बळ, दुष्काळी आटपाडी तालुका पाणीदार वर्षभराच्या कामानंतर तब्बल 20 गावाच्या भोवती 25-30 किलोमीटर लांबी इतके कॅनाल तयार झाले आणि टेंभू योजनेचे पाणी आपल्या गावात येण्याचे लोकांचे स्वप्न पूर्ण झाले. आज या गावांमध्ये ऊसाबरोबरच वेगवेगळी पिके घेतली जातात, त्याशिवाय आजपर्यंत या गावात सुरु असलेले टँकर देखील बंद झाले आहेत. लोकसहभागातून झालेल्या या कामाने कित्येक वर्षे पाण्याची वाट पाहणाऱ्या लोकांच्या दारात आज पाणी पोहोचले आहे. ज्यामुळे या भागातील शेती तर बहरली आहेच, त्याशिवाय दुष्काळी भाग ही ओळख देखील पुसण्यास मदत होऊ लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget