एक्स्प्लोर

राज्यात दुष्काळ जाहीर, मात्र अंमलबजावणीच्या नावानं बोंबाबोंब

जमीन महसुलात सूट, शेती निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये 33 टक्के यांसारख्या सवलती राज्यातील दुष्काळी पट्ट्यात कुठेच राबवलं जात नसल्याचं समोर येत आहे.

मुंबई : राज्य सरकारनं 31 ऑक्टोबरला राज्यातल्या 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र लोकप्रिय घोषणांच्या गदारोळात सरकार दुष्काळी पट्ट्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर येत आहे. कारण राज्यात दुष्काळ जाहीर झाला, मात्र त्याची अंमलबजावणी कुठेच होताना दिसत नाही.

जमीन महसुलात सूट, शेती निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये 33 टक्के यांसारख्या सवलती राज्यातील दुष्काळी पट्ट्यात कुठेच राबवलं जात नसल्याचं समोर येत आहे.

याच मुद्द्यावरून विरोधकांनी आता सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.

दुष्काळी भागांसाठी सवलती - जमीन महसूलातून सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन - शेती निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती - कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये 33.5 टक्के सूट - शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी - रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता - आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर - टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित करू नये - चारा उपलब्ध आहे का? याचा आढावा घेणे चारा उपलब्ध नसेल तर जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे किंवा चारा तगाई देणे

राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.

गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (112) सांगली (5) : जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगांव सातारा (1) : माण-दहीवडी सोलापूर (9) : करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर पालघर (3) : पालघर, तलासरी, विक्रमगड धुळे (2) : धुळे, सिंदखेडे जळगाव (13) : अमळनेर, भडगांव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल नंदुरबार (3) : नंदुरबार, नवापूर, शहादा नाशिक (4) :  बागलान, मालेगांव, नांदगांव, सिन्नर अहमदनगर (11) : कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, रोहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड औरंगाबाद (9) : औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड,सोयगाव, वैजापूर, कन्नड बीड (11) :  आष्टी, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, शिरुर (कासार), वडवणी, केज, आंबेजोगाई, परळी, पाटोदा, जालना (7) : अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसांगवी, जाफ्राबाद, जालना, परतूर नांदेड (2) : मुखेड, देगलूर उस्मानाबाद (7) : लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम परभणी (6) : मनवथ, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू हिंगोली (2) :  हिंगोली, सेनगाव अमरावती (1) : मोर्शी बुलडाणा (7) : खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा यवतमाळ (6) :  बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव चंद्रपूर (1) : चिमूर नागपूर (2) : काटोल, कळमेश्वर मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (39) पुणे (7) - आंबेगाव, पुरंदर, सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरुर-घोडनंदी सातारा (2) - कोरेगांव, फलटण धुळे (1) - शिरपूर नंदुरबार (1) - तळोदे नाशिक (4) - देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड नांदेड (1) - उमरी हिंगोली (1) - कळमनुरी लातूर (1) - शिरुर अनंतपाळ अकोला (5) - बाळापूर, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोला अमरावती (4) - अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगांव सुर्जी बुलडाणा (1) - मोताळा वाशिम (1) - रिसोड यवतमाळ (3) - केलापूर, मारेगांव, यवतमाळ चंद्रपूर (4) - ब्रम्हपुरी, नागभिर, राजुरा, सिंदेवाही नागपूर (1) - नरखेड वर्धा (2) - आष्टी, कारंजा

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget