बेजबाबदार वाहन चालकांना 'ब्रेक' लावण्यासाठी नवे नियम
वेळीच सुधरा, नाहीतर.....मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी आणि रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारनं एक मोठं पाऊल उचललं आहे.
मुंबई : मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी आणि रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारनं एक मोठं पाऊल उचललं आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह अर्थात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांना 10 हजार रुपये आणि विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. खुद्द परिवहन मंत्री अनिल परब यांनी दंडाची रक्कम वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
इतकंच नव्हे, तर रिक्षा आणि टॅक्सीसाठी नवं परमिट देणंही थांबवण्यात येणार असून, रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
Maharashtra Traffic Fines | राज्यात लवकरच नवीन दंड आकारणी; 'हे' नियम मोडल्यास कारवाई
राज्य सरकानं केंद्रीय मोटर वाहन दुरुस्ती कायदा (2019) हा जवळपास एका वर्षासाठी रोखून धरला होता. ज्या धर्तीवर नवा दंड कायदाही लागू करण्यात आला नव्हता. पण, आता तो लागू करण्याचे संकेत आणि त्याबाबतचा इशाराही राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळं मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणं, विनापरवाना वाहन चालवणं, वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगानं वाहन चालवणाऱ्यांना मोठा दंड बसणार आहे. यासाठी राज्य सरकार वाहतूक विभाग आता अधिकत कठोर होताना दिसत आहे.
Ind vs Aus | भारतीयांना कमी लेखण्याची चूक कधीही करु नका, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचं सूचक वक्तव्य
रस्ते वाहतुक आणि एकंदरच राज्यातील वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता आणत बेजबाबदार वाहन चालकांवर चाप बसवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यामुळं किमान वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.