आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन, जाणून घ्या काय आहे इतिहास
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला (Dr Babasaheb Ambedkar Marathwada University) देण्यासाठी सुमारे 17 वर्षे आंदोलन झाले.

औरंगाबाद : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा (Dr Babasaheb Ambedkar Marathwada University) नामविस्तार दिन. त्यानिमित्ताने आज विद्यापीठ गेटवर अनेक अनुयायी एकत्र येतात आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी सुमारे 17 वर्षे आंदोलन झाले. 1994 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले. कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळे या वर्षी कोविडच्या नियम पाळूनच अभिवादन करता येणार आहे.
नामांतराचा लढ्याच्या इतिहासावर एक नजर टाकूयात
नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधुभाव पुढे नेणारा लढा होता.
विद्यापीठाचा नामांतर हे केवळ आंदोलन नव्हते, तर त्याला सामाजिक लढ्याचे स्वरूप आलं होतं.
1972ला दलित पॅंथरची स्थापना झाली.
गायरान जमिनी मिळाव्यात, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ व्हावी, यासह इतर मागण्यांसाठी दलित पॅंथरचं आंदोलन सुरू होतं.
त्या बरोबरच औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, ही मागणीनं जोर धरला.
1974च्या मराठवाडा विकास आंदोलनात नामांतराची मागणी झाली. दलित युवक आघाडी ही नामांतराच्या मागणीचा पाठपुरावा करत असे .
1977ला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी या मागणीची दखल घेतली. नामांतराचं आश्वासनही दिलं. 1978ला महाराष्ट्रात सरकार बदललं.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार सत्तारूढ झालं होतं . विधान परिषदेत आमदार पा. ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, अशी मागणी लावून धरली.
27 जुलै 1978ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी घोषणा झाली.
दलित पँथर नेते प्रा. अरुण कांबळे यांनी या नामविस्तारास विरोध दर्शविला. पँथरला निर्भेळ नामांतर हवे होते.
रात्रीतून नामांतर विरोधात दंगली सुरू झाल्या. एक दीड वर्ष मराठवाडा धुमसत होता. या आंदोलनात अनेकांनी प्राणांची आहुती दिली
शेवटी एका विद्यापीठाची फाळणी झाली. एकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद तर दुसऱ्याला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अशी विस्तारित नावं दिली गेली.
तो नामविस्तार दिन 14 जानेवारी म्हणून मोठ्या उत्साहाने औरंगाबाद येथे साजरा केला जातो.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
महत्त्वाच्या बातम्या






















