एक्स्प्लोर
डोंबिवलीत कॉलेजसमोर विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने हत्या

कल्याण : डोंबिवलीत भरदिवसा एका विद्यार्थ्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. साऊथ इंडियन कॉलेजसमोर विद्यार्थ्याची शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. प्रणव मोरे असं मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. बीकॉम फायनलमध्ये शिकत असलेल्या प्रणव मोरेवर दोन हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं वार केले. हे वार इतके गंभीर होते, की प्रणव मोरेचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दोन्ही हल्लेखोर फरार झाले असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. प्रेम प्रकरणातून प्रणवची हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
Before You Go
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















