एक्स्प्लोर
साताऱ्यात डॉक्टाराचे सिनेस्टाईल अपहरण, 24 तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या
साताऱ्यातील फलटण येथील ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. संजय राऊत यांचे काल रात्री दहा वाजता त्यांच्या घरा समोरुन अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी डॉक्टरांच्याच मोबाईलवरुन त्यांच्या कुटुंबीयांना पाच कोटी रुपये बारामतीला आणण्यास सांगितले.
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटनमध्ये पाच कोटी रुपयांसाठी अपहरण केलेल्या डॉक्टरांची पोलिसांच्या थरार नाट्यानंतर सुटका झाली आहे. पोलिसांनी अपहरण करणाऱ्या दोन टीमपैकी एका टीममधील तिघांना अटक केली असून एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. थरार नाट्यानंतर डॉक्टरांची सुटका करण्यामध्ये पोलीस यशस्वी झाले.
साताऱ्यातील फलटण येथील ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. संजय राऊत यांचे काल रात्री दहा वाजता त्यांच्या घरा समोरुन अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी डॉक्टरांच्याच मोबाईलवरुन त्यांच्या कुटुंबीयांना पाच कोटी रुपये बारामतीला आणण्यास सांगितले.
त्याच दरम्यान नातेवाईकांनी तात्काळ पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी त्वरीत चक्रे फिरवत त्यांचा नंबर कोणत्या भागात आहे याचा शोध घेतला. संजय राऊत यांच्या नंबरचा लोकेशन तपासून पोलिसांनी बारामती गाठलं. बारामतीमध्ये पोलिसांनी अपहरण करणाऱ्या एका टीमला चित्रपटाला साजेल असा थरार घडवत ताब्यात घेतले. मात्र अपहरणकर्त्यांना ज्या जागेवरुन ताब्यात घेतले तेथे डॉ. संजय राऊत नव्हते.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमार्फत दुसऱ्या टीमला फोनवरुन पैसे मिळालेत, डॉक्टरांना सोडा असे सांगून डॉक्टरांना सोडण्यास लावले. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना सोडून दिले. मात्र अपहरणकर्त्यांना पोलिसांनी त्यांच्या साथीदारास ताब्यात घेतल्याचे लक्षात आल्यावर सर्वच जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement