एक्स्प्लोर
Advertisement
हेल्मेट सक्ती नको, पुणेकरांचं पालकमंत्र्याना निवेदन
नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हे समीकरण पुन्हा उफाळून आलं आहे. ही सक्ती हटवण्यासाठी हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने पालकमंत्री गिरीश बापट यांना निवेदन दिलं.
पुणे : हेल्मेट सक्ती नको या मागणीसाठी पुणेकरांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना निवेदन दिले आहे. हेल्मेट सक्ती आणि पुणेकरांचा विरोध हे समीकरण तसं जुनंच आहे. पण नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हे समीकरण पुन्हा उफाळून आलं आहे. ही सक्ती हटवण्यासाठी हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने पालकमंत्री गिरीश बापट यांना निवेदन दिलं.
हेल्मेट वापरण्याला विरोध नसून, सक्तीला विरोध असल्याचं हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच म्हणणं आहे. वाहतुकीच्या इतर नियमांचं पालन पुणेकर करत असून, हेल्मेट सक्तीतून मुक्तता द्यावी, अशी मागणी समितीने केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीकडून देण्यात आला आहे.
हेल्मेट सक्तीचा निर्णय केंद्राशी निगडीत आहे. तरी राज्य सरकार ,पोलीस आणि आरटीओशी चर्चा करून व्यवहारिक मार्ग काढू, असं आश्वासन गिरीश बापट यांनी दिलं.
संपूर्ण देशभरात सुमारे 35 हजार जणांचा मृत्यू हेल्मेट न घातल्याने झाल्याची धक्कादायक आकडेवारी काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन पुण्यात हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement