एक्स्प्लोर

ठेवीदारांचं वाटोळं करणाऱ्या 'शुभ कल्याण'च्या दिलीप आपेटला बेड्या

शुभ कल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन दिलीप आपेटला अटक करण्यात आली आहे.

बीड: ठेवीदारांना जवळपास 10 कोटींपेक्षा जास्त रकमेला गंडा घातल्याप्रकरणी, शुभ कल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन दिलीप आपेटला अटक करण्यात आली आहे. ठेवीदारांना जास्त व्याजदराचं आमिष दाखवून, दिलीप आपेटने ठेवीदारांना गंडवल्याचा आरोप आहे. त्याने ठेवीदारांचे पैसे परत दिलेच नाहीत. दिलीप आपेट मागच्या अनेक महिन्यापासून कुटुंबासमवेत फरार होता. काल पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली. बीड जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्या. ठेवीदारांचं वाट्टोळं करणारी बीडची शुभकल्याण बँक  शुभ कल्याण मल्टीस्टेट बँकेच्या राज्यात आणि राज्याबाहेरही जवळपास शंभर शाखा होत्या. ज्या शाखांमधून जास्तीचे व्याजदर देण्याचं आमिष ठेवीदारांना दाखवलं होतं. मात्र ठेवीदारांनी जे पैसे गुंतवले ते त्यांना परत मिळालेच नाहीत. शिवाय दिलीप आपेटची खासगी मालकी असलेल्या शंभू महादेव साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊसाचे 55 कोटी रुपये थकीत रक्कम देणे बाकी आहे. दिलीप आपेट आणि संचालकांवर बीड जिल्ह्यात एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. राज्यभरातही विविध ठिकाणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? नाव शुभकल्याण आहे, मात्र या बँकेने बीड जिल्ह्यातील हातावर पोट भरवणाऱ्या अनेक ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना गंडवलं. बँकेचा संचालक गेली अनेक दिवस पोलिसांच्या हाती लागत नव्हता. कधी काळी भाजपचं काम करणाऱ्या दिलीप आपेट या व्यावसायिकाने बँकेच्या माध्यमातून लोकांना हा गंडा घातला. इतर बँकाच्या तुलनेत शुभकल्याण मल्टीस्टेट बँक ठेवीवर जास्त व्याजदर देण्याची ऑफर देत होती. याच भूलथापांना बळी पडून परळीच्या थर्मल पॉवर स्टेशनमध्ये नोकरी करुन निवृत्त झालेल्या शंकर राऊत यांनी आपल्याकडील पेन्शनचे आलेले सगळे 23 लाख रुपये या बँकेत फिक्स केले. सुरुवातीचे तीन-चार महिने व्याज मिळालं. मात्र पुन्हा या बँकेला टाळं लागलं जे अद्याप उघडलेलंच नाही. शंकर राऊतांसारखे अनेक गुंतवणूकदार पुरते फसले आहेत. कारखान्यातूनही शेतकऱ्यांची फसवणूक दिलीप आपेट याच्या बँकेसारखीच अवस्था त्याची मालकी असलेल्या शंभू महादेव साखर कारखान्याची आहे. गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी या साखर कारखान्याला ऊस दिला, त्या ऊसाचे पैसे अद्याप देण्यात आले नाहीत. दहा कोटी रुपये थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी साखर कारखाना जप्तीची तयारी दर्शवली आहे. केज तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांना जागेवरच पैसे देतो, तुम्ही आमच्याकडे ऊस घाला असं आमिष दाखवलं गेलं. मात्र ऊस जाऊन वर्ष लोटलं तरी एक पैसाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. को आहे दिलीप आपेट? मूळ परळीच्या असलेल्या दिलीप आपेटने 1982 साली वाघाळा साखर कारखान्यावर सुपरवायजर म्हणून काम केलं. त्यानंतर सोलापूर आणि माजलगावच्या साखर कारखान्याचा तो कार्यकारी संचालक बनला. उस्मानाबादच्या हावरगावमध्ये 2002 साली स्वतःच्या मालकीचा साखर कारखाना काढला. दिलीप आपेट याचे भाऊ उमाकांत आपेट हे भाजपचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष होते. दिलीप आपेटसह सगळे संचालक गेल्या अनेक महिन्यापासून फरार आहेत. शुभकल्याण बँकेवर अंबाजोगाई, परळी आणि माजलगावात गुन्हे दाखल होण्याआधीच दिलीप आपेटने शक्कल लढवली आणि अकरा संचालंकाऐवजी बँकेचे फक्त पाचच संचालक असल्याची नोंदणी दिल्लीत केली. विशेष म्हणजे या पाच संचालकात दिलीप आपेटचा ड्रायव्हर, कारखान्याचा सुरक्षा रक्षक आणि शिपायाचा समावेश आहे. त्यामुळे दिलीप आपेटने शेतकऱ्यांसह सरकारलाही फसवलं. दरम्यान, दिलीप आपेटच बँकेचा संचालक असल्याचा पुरावाही एबीपी माझाने शोधला. दिलीप आपेट संचालक असलेली यादी स्पष्टपणे सांगते की त्याने सरकारलाही फसवलंय. शिवाय आपण ठेवीदारांची फसवणूक केली नसल्याचं पत्रही स्वतः संचालक या नात्याने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलं होतं. दिलीप आपेटचा भाऊ उमाकांत आपेटने काही महिन्यांपूर्वी एका मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. त्या चित्रपटाचं नाव ‘या टोपी खाली दडलंय काय?’ असं होतं. हा चित्रपट चालला का ते माहित नाही. मात्र, दिलीप आपेटने लोकांना कोट्यवधी रुपयांना घातलेल्या टोपीमुळे आज अनेकांच्या सुखी संसाराला मात्र कायमची घरघर लागली आहे. संबंधित बातम्या बीड : कोट्यवधींचा गैरव्यवहार करुन दिलीप आपेट फरार, आमरण उपोषणाचा ठेवीदारांचा इशारा   ठेवीदारांचं वाट्टोळं करणारी बीडची शुभकल्याण बँक 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget