(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhule: धुळेकरांसाठी दिलासादायक बातमी! जिल्ह्याच्या पाणी पातळीत वाढ, जिल्हा टंचाईमुक्त
धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विहिरींची पाण्याची पातळी सरासरी 0.95 मीटरने वाढली असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
Dhule News: धुळे शहरासह जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाने (Dhule Water Issue) हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे. एकीकडे या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, मात्र दुसरीकडे या पावसामुळे जिल्ह्याच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाकडून जिल्ह्यातील 107 विहिरींची तपासणी करण्यात आली यात विहिरींची पाण्याची पातळी 0.95 मीटरने वाढली आहे
भूजल सर्वेक्षण विभागाकडून जिल्ह्यातील 107 निरीक्षण विहिरींची नुकतीच तपासणी करण्यात आली, यातून सकारात्मक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील विहिरींची पाण्याची पातळी सरासरी 0.95 मीटरने वाढली असल्याने समाधान व्यक्त होत आहे. धुळे जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 655.30 मिलिमीटर इतके असून दर पाच वर्षातून एकदा सरासरीपेक्षा अत्यंत कमी पावसाची हजेरी लागत असल्याने जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जातात. तसेच जिल्ह्याचा 92 टक्के भूभाग अग्निजन्य खडकांनी व्यापलेला आहे. यामुळे भूजलाची पातळी निरनिराळ्या क्षेत्रात वेगवेगळी आढळून येत असते.
चार तालुक्यातील 107 विहिरींचे निरीक्षण
जिल्ह्याची पाणी पातळी मोजण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाकडून जिल्ह्यातील चारही तालुक्यांमधील 107 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले यातून या विहिरींचा जलस्तर तपासण्यात आला. यात धुळे तालुक्यातील 33 साक्री तालुक्यातील 31 शिंदखेडा तालुक्यातील 25 शिरपूर तालुक्यातील 18 इतक्या विहिरींचा समावेश होता. यात धुळे तालुका आणि साक्री तालुक्यात भूजल पातळी समाधानकारक असल्याचे दिसून आले आहे.
मात्र शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने या दोन्ही तालुक्याच्या पाणी पातळीत फारशी वाढ झालेली दिसून आलेली नाही. दरम्यान जिल्ह्यात वाढलेल्या भूजल पातळीमुळे काही गावे अपवाद वगळता जिल्हा टंचाईमुक्त झाला असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये भर उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तसेच विहिरी अधिग्रहित केल्या जातात. मात्र यंदा झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
तालुकानिहाय पाणी पातळी
धुळे तालुका 1.49
साक्री 1.51
शिंदखेडा 0.41
शिरपूर 0.95
ही बातमी देखील वाचा
Latur News: आनंदाची बातमी! भूजल पातळीत चार फुटाची वाढ; दुष्काळी लातुरात पाण्याचा सुकाळ