एक्स्प्लोर
चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, नराधमाला 14 वर्षांचा तुरुंगवास
दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल. धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. धुळे येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डॉ. सृष्टी नीलकंठ यांनी 2013 सालच्या या प्रकरणावर निकाल दिला.
धुळे : चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला 14 वर्षांची शिक्षा आणि 40 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल. धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला.
धुळे येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डॉ. सृष्टी नीलकंठ यांनी 2013 सालच्या या प्रकरणावर निकाल दिला.
1 मार्च 2013 मध्ये धुळे शहरातील मोहाडी परिसरातील चार वर्षीय चिमुकलीच्या परिवाराशी परिचित गावातील गोविंद नारायण घुले या 45 वर्षीय नराधमाने वडिलांकडे घेऊन जातो अशी बतावणी करत मोहाडी गावापासून काही अंतरावर असलेल्या एका निर्जनस्थळी नेत त्या ठिकाणी या चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केला.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्कार, तसेच लहान मुलांचे लैंगिक प्रतिबंधक अत्याचार अधिनियम कलम 3, 4, 6 अन्वये मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
न्यायालयात साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी यांनी दिलेल्या साक्षी आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्यासाठी निर्णायक ठरल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement