धुळ्यातील रियल स्टार शुभम सिंघवीचा अपघातात मृत्यू, गणेश विसर्जन करुन घरी परतताना घडली घटना
धुळे (Dhule) शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. धुळ्यातील रियल स्टार शुभम सिंघवी (Shubham Singhvi) याचा अपघातात दुर्दैव मृत्यू झाला आहे.
Dhule Accident : धुळे (Dhule) शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. धुळ्यातील रियल स्टार शुभम सिंघवी (Shubham Singhvi) याचा अपघातात (Accident) दुर्दैव मृत्यू झाला आहे. गणेश विसर्जन करून घरी परत येत असताना अपघाताची घटना घडली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या कुंडाणे फाट्याजवळ ही अपघाताची घटना घडली आहे.
मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या कुंडाणे फाट्याजवळ घडली भीषण अपघाताची घटना
सहजीवननगर येथील रहिवासी असलेल्या शुभम सांगवी (Shubham Singhvi) या युवा उद्योजकाचा आज गणेश विसर्जन करून घरी परत येत असताना मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या कुंडाणे फाट्याजवळ भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुळे शहरालगत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्यावर मोटर सायकलचा अपघात झाला. रात्री उशिरापर्यंत मोठ्या मंडळाचे विसर्जन हे तापी पात्रात करण्यात येत असते आणि त्यासाठी शुभम संघवी आज सकाळी आपल्या दुचाकीने गणेशविसर्जनासाठी तापी नदी पात्रात गेला होता. परत येत असताना मोटर सायकलचा अपघातात झाला आणि जागेवरच शुभमचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अकोल्यातही गणेश भक्तांच्या वाहनाचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू
अकोल्यातून (Akola) एक दुःखद बातमी समोर येत आहे. गणेश विसर्जन करुन परत येणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. अकोल्यातील पातूर-अकोला रस्त्यावर ही घटना घडली आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत झालेला तरुण आणि जखमी झालेले सर्वजण अकोल्यातील शिवसेना वसाहत भागातील रहिवासी आहेत. जय बजरंग गणेश उत्सव मंडळाच्या गणरायाच कापशी तलावावरुन गणेश विसर्जन करुन परतीच्या प्रवासात असताना हा अपघात झाला आहे. मृत आणि जखमी असे चौघे जण एकाच दुचाकीवर जात असताना त्यांच्या दुचाकीला कारने जबर धडक दिली आहे. त्यामुळं हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अक्षरशः दुचाकीचा चूराडा झाला आहे. तर कारच देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान रामचरण अंधारे असं अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव. तर राहुल खोंड, विनोद डांगे, विकी माळी हे गंभीर असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
महत्वाच्या बातम्या:























