एक्स्प्लोर

सांगलीत हार्दिक पटेलच्या उपस्थितीत धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार

सांगलीतील आरेवाडीत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचीही या मेळाव्याला उपस्थिती होती. धनगर समाजाने आरक्षणासाठी सरकारविरोधात रणशिंग फुंकलं आहे.

सांगली : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भाजप सरकारविरोधात आज धनगर समाजाने रणशिंग फुंकलं आहे. सरकारला दोन महिन्यांचा अल्टिमेटम देत राज्यातील भाजपाच्या आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघात सरकार विरोधात जागृती सभा आयोजित करण्याचा निर्धार दसरा मेळाव्यात करण्यात आला. तसेच मुंबईतील लढ्याचाही चंग बांधण्यात आला आहे. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीत सांगलीच्या आरेवाडी येथे हा दसरा मेळावा पार पडला. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला राज्यातील कानाकोपऱ्यातून धनगर बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. बिरोबाचं दर्शन घेऊन हार्दिक पटेल यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य मेळावा सुरू झाला. यावेळी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत गेल्या चार वर्षांपासून भाजप सरकार धनगर समाजाला फसवण्याचे उद्योग करत असल्याचा आरोप केला. या सरकारने धनगर समाजाला खोटी आश्वासने देण्याचे बंद करून दोन महिन्यात धनगर समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा भाजपाच्या विरोधात धनगर समाज जाईल, असा इशारा देत आरक्षण नाही मिळालं तर भाजपा विरोधात मतदान करण्याचं आवाहन यावेळी पडळकर यांनी या मेळाव्यात धनगर समाजाला केलं. हार्दिक पटेल यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडलं. देशात आज सर्वच समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर आले आहेत. मात्र सरकारकडून या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. सर्व समाज आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आरक्षणासाठी लढा देत आहे. देशाचा आणि राज्याचा भविष्य आजची तरुण पिढी असून तरुणांनी लढायला शिकलं पाहिजे, असं आवाहन करत धनगर आरक्षणाच्या मागणीला हार्दिक पटेल यांनी पाठिंबा दिला. माझ्या येण्याने धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. पण दिल्लीत त्याचा आवाज जरूर पोहोचेल, असा टोला हार्दिक पटेल यांनी लगावला. त्याचबरोबर धनगर समाजाने एकजूट होत अस्तित्वाचा आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी लढा दिला पाहिजे, असं आवाहन करत धनगर समाजाने या मागणीसाठी आता मुंबईमध्ये एकजूट होऊन आरक्षणाची मागणी केली पाहिजे, असं स्पष्ट करत धनगर समाजाला ‘मुंबई चलो’चा नारा दिला आहे. या मेळाव्यात आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातल्या 91 भाजप आमदार त्याचबरोबर खासदार यांच्या मतदारसंघांमध्ये या आरक्षणाबाबत जागृती आणि सरकारविरोधात सभा घेण्याचा निर्धार ही करण्यात आला आहे. पुढील टप्पा हा मुंबईचा राहील आणि त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळेपासून मुंबई असा लाँग मार्च काढून सर्टिफिकेट मिळेपर्यंत मुंबईमध्ये ठिय्या मारण्याचा निर्धार यावेळी समस्त धनगर समाजाने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget