एक्स्प्लोर
मोठी बातमी! वैद्यनाथ सहकारी साखर चालवण्यासाठी धनंजय मुंडेंनी कंबर कसली; सरकारला प्रस्ताव पाठवणार?
Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana : धनंजय मुंडे स्वतः पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Dhananjay Munde
Source : PTI
Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केल्याने त्या अडचणीत आल्या आहे. मात्र, आता पंकजा मुंडेचा साखर कारखाना वाचवण्यासाठी धनंजय मुंडेनी कंबर कसली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारखन्याकडून सरकारला प्रस्ताव पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती देखील समोर येत आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे स्वतः पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
आणखी वाचा























