एक्स्प्लोर
धनंजय मुंडेंच्याच सांगण्यावरुन अजित पवार बोलले : पंकजा मुंडे

A
बीड : माझे बंधू धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरुनच अजित पवार गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेविषयी बोलत आहेत, अशा शब्दात राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी निशाणा साधला. पवारांना पाहून मुंडेंनी वाढदिवस ठरवला : अजित पवार गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचाही वाढदिवस 12 डिसेंबरला असल्याचा सार्वत्रिक समज आहे. मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचं समजेल, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘माझा कट्टा’वर केला होता. ही माहिती खुद्द गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं. पवारांच्या घरात संस्काराची कमी : पंकजा मुंडे यावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "ही गोष्ट धक्कादायक आहे. सोशल मीडियामार्फत हा विषय माझ्यापर्यंत पोहोचला. 'माझा कट्टा'वर जाणाऱ्या व्यक्तीने काय बोलावं हा विषय एका उंचीचा असावा. पण मला अजित पवारांवर विश्वास आहे, कारण ते स्पष्ट बोलतात. त्यामुळे माझे बंधू धनंजय मुंडेंनीच त्यांना हे सांगितलं असावं." दुसरीकडे मला याबाबत काहीही बोलायचं नाही, असं सांगत धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या जन्मतारीख वादाबाबत बोलण्यास नकार दिला आहे. मनमोहन सिंहांनी मुंडेंना काँग्रेसमध्ये घेतलं नाही, अजित पवारांचा गौप्यस्फोट अजित पवारांचं वक्तव्य कुटुंबीयांसाठी वेदनादायी गोपीनाथ मुंडेंना जर जन्मतारीख बदलायची असती, तर अटल बिहारी वाजपेयी यांची जन्मतारीख लावली असती. अजित पवारांचं हे वक्तव्य माझ्या कुटुंबीयांसाठी वेदनादायी असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या. पवारांच्या घरी संस्काराची कमी पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी नेहमी शरद पवार यांचा आदर, सन्मान केला आहे. हा माझ्या संस्काराचा भाग आहे. पण अजित पवार यांच्या वक्तव्यावरुन पवारांच्या घरात संस्काराची कमी असल्याचं दिसतं.” "गोपीनाथ मुंडेंनी जन्म तारीख बदलल्याचा आरोप धादांत खोटा" काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल मुंडेंची माझ्याशी चर्चा नाही तसंच गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल माझ्याशी कधीच चर्चा केली नाही. आमदार असताना मी त्यांच्यासोबत दिल्लीलाही गेले नाही, असा दावाही पंकजा यांनी केला आहे. पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























