एक्स्प्लोर
महादेव जानकरांना योग्यवेळी उत्तर देऊः धनंजय मुंडे
बीडः भगवान गडावरील दसरा मेळाव्याच्या भाषणातून पंकजा मुंडेंनी सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली. मात्र विरोधी पक्ष नेते आणि पंकजांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांनी त्यांच्या या भाषणावर उपरोधिक टीका केली आहे. शिवाय महादेव जानकर यांनी केलेल्या विधानाचा समाचारही धनंजय मुंडेंनी घेतलाय.
VIDEO: भगवान गड दसरा मेळावाः पंकजा मुंडेंचं संपूर्ण भाषण
पंकजा मुंडेंच्या भाषणावर टीका भगवान गडावर सभेला परवानगी नाकारल्याने पंकजा मुंडे यांनी भगवान गडाच्या पायथ्याशी सभा घ्यावी लागली. मात्र त्यांना गडावरुन पायथ्याशी यावं लागलं, याचं आत्मचिंतन त्यांनी करण्याची गरज आहे, असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला.भगवान गड दसरा मेळावाः बारामतीची वाट लावल्याशिवाय राहणार नाही, महादेव जानकरांचा अजित पवारांवर हल्लाबोल
आपल्यामुळे सर्व भावांना लाल दिवा मिळाला असा दावा पंकजांनी केला. त्यावरही धनंजय मुंडेंनी भाष्य केलं. पंकजा असा दावा करत असल्या तरी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत आपण माघार घेतल्यामुळं त्यांना आमदार होता आलं, हे त्यांनी विसरु नये, असं धनंजय मुंडेंनी सांगितलं.VIDEO: भगवान गड दसरा मेळावाः ताईंमुळेच राज्यमंत्र्याचा कॅबिनेट मंत्री झालो, राम शिंदेंचं संपूर्ण भाषण
महादेव जानकरांना योग्यवेळी उत्तर देऊः धनंजय मुंडे महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी नेते अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या या टीकेला कुठं आणि कधी उत्तर द्यायचं हे आपल्याला चांगलं माहित आहे, असं धनंजय मुंडेंनी सांगितलं.VIDEO: जानकरांना कुठे, कधी उत्तर द्यायचं ते चांगलं माहित आहेः धनंजय मुंडे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement