एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लाथ मारण्याने उद्धव ठाकरेंचा एक पाय लांब झाला : धनंजय मुंडे
एकीकडे मुख्यमंत्री म्हणताहेत आम्ही लाथ मारली तर दुसरीकडे उध्दव ठाकरे म्हणताहेत आम्ही लाथ मारली. एकमेकांना लाथ मारायचा प्रकार एवढा झालाय की उध्दव ठाकरे साहेबांचा एक पाय लांब झालाय की काय असं मला वाटायला लागलंय, असा टोमणाही मुंडे यांनी लगावला.
सातारा : पाच मंत्रीपदाच्या तुकड्यासाठी शिवसेना भाजपसमोर लाचार झाली आहे. भाजप-शिवसेनेचे भांडण म्हणजे चौकातील कुत्र्यांच्या भांडणासारखं आहे, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. एकीकडे मुख्यमंत्री म्हणताहेत आम्ही लाथ मारली तर दुसरीकडे उध्दव ठाकरे म्हणताहेत आम्ही लाथ मारली. एकमेकांना लाथ मारायचा प्रकार एवढा झालाय की उध्दव ठाकरे साहेबांचा एक पाय लांब झालाय की काय असं मला वाटायला लागलंय, असा टोमणाही मुंडे यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेतील फलटण येथील सभेत ते बोलत होते. ही निर्धार यात्रा म्हणजे भाजपची अंतयात्रा आहे, असेही ते म्हणाले.
याआधी 72 च्या दुष्काळाचे उदाहरण दिले जात होते मात्र यापुढे 2017-18 हे वर्ष भीषण दुष्काळाचे उदाहरण म्हणून दिले जाईल. शेतकरी स्वतःचे सरण रचून आत्महत्या करत आहेत. सरकारमधील मंत्री महादेव जानकर ज्यांना सर्व गोष्टींची जाण आहे असा समज आहे, ते म्हणतात की आम्ही ऑनलाईन चारा देऊ. ऑनलाईन चारा कसा पोहोचेल. त्याचीही अवस्था कर्जमाफीसारखी होईल. ऑनलाईनचा खेळ लावला आहे, अशी टीका त्यांनी केली. दिवसाढवळ्या जनतेच्या पैशाची लूट केली ते भाजपवाले कुठल्या तोंडाने मत मागायला येणार आहेत अशी विचारणाही धनंजय मुंडे यांनी केली.
गाजरालाही लाज वाटायला लागली : अजित पवार
राज्यातील शेतकऱ्यांची चेष्टा या सरकारने चालवली आहे. मंत्रिमंडळात शेतकऱ्यांचा वाली कोण नसल्याने ही हालत झाली आहे. कोण आहे तिथे सत्तेत फडणवीस, मुनगंटीवार, बापट, हे शेतकरी आहेत का? हे जाण नसलेले नेते सत्तेत बसले असल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. मग ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करायचा? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केला. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील, शेतकऱ्यांना मातीत घालणारे आहे अशी टीकाही पवार यांनी केली.
यांच्याकडून नुसती गाजरं दाखवण्यात येत आहे. आता त्या गाजरालाही लाज वाटायला लागली आहे, परंतु यांना लाज वाटत नाही. अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा असेही ते म्हणाले. आज 21 व्या शतकात आपण आहोत आणि तुम्ही हनुमानाची जात काढता आहात. दुसरीकडे राहुल गांधी यांचे गोत्र काढून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम भाजप सरकार करत आहेत असा आरोप पवार यांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
करमणूक
Advertisement