एक्स्प्लोर
... तर मुंबई पोलिस मुन्ना यादवला अटक करतील : माथुर
गेल्या 45 दिवसांपासून मुन्ना यादव फरार असून नागपूर पोलिस राजकीय दबावापोटी मुन्नाला अटक करत नसल्याचा आरोप पोलिसांवर केला जात आहे.
नागपूर : गेले 45 दिवस फरार असलेला भाजप नेता मुन्ना यादवला जर नागपूर पोलिस शोधू शकत नसतील, तर त्यांनी मुंबई पोलिसांना सांगावं, आम्ही मुंबईत त्याला अटक करु, अशा शब्दात पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी नागपूर पोलिसांना घरचा आहेर दिला आहे.
21 ऑक्टोबरला दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकणात मुन्ना यादव मुख्य आरोपी आहे. गेल्या 45 दिवसांपासून मुन्ना यादव फरार असून नागपूर पोलिस राजकीय दबावापोटी मुन्नाला अटक करत नसल्याचा आरोप पोलिसांवर केला जात आहे.
पोलिस महासंचालक सतीश माथुर यांच्या पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित झाला. फरार आरोपी नागपुरात आणि मुंबईत उघडपणे फिरत असताना त्याला अटक का केली जात नाही, या प्रश्नावर नागपूरचे पोलिस अधिकारी काहीच उत्तर देऊ शकत नसल्याचं पाहून अखेरीस सतीश माथुर यांनी हस्तक्षेप केला.
जर नागपूर पोलिस आरोपीला शोधू शकत नसेल, तर आम्हाला सांगा, आम्ही त्याला मुंबईत अटक करु, अशा शब्दात माथुरांनी नागपूर पोलिसांना खडे बोल सुनावले. गेल्या 45 दिवसांपासून फरार असलेला मुन्ना यादव भाजपचा नेता असून राज्य सरकारच्या इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा अध्यक्ष आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement