एक्स्प्लोर

खडसे आणि महाजनांचं मनोमिलनानंतर फडणवीस जळगावमध्ये ; खडसेंची भेट होणार का?

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावमध्ये दाखल झाले आहेत. धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस दोन दिवस उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

जळगाव : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावमध्ये दाखल झाले आहेत. धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस दोन दिवस उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच खडसेंनी फडणवीस आणि महाजनांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होते का? हे पाहणं महत्वाचं आहे. तरी, राज्याची सत्ता हातातून गेल्यानंतर भाजप आता स्थानिक निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणुकांनंतर आता राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून वातावरण तापलं आहे. जळगाव जिल्हा परिषदेवर एकनाथ खडसेंचं वर्चस्व आहे. तसेच जळगावमध्ये एकनाथ खडसे यांची शिवसेनेला साथ मिळण्याची शक्यता असल्याचं काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटिल यांनी सांगितले होते. आधी गंभीर आरोप आणि 24 तासांत मनोमिलन, असं काहीसं चित्र काल भाजपात पाहायला मिळालं. फडणवीस आणि महाजनांमुळे आपलं तिकीट कापलं, असा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केला होता. त्यानंतर गिरीश महाजनांनीही एकनाथ खडसेंना थेट आव्हान दिलं होतं. याला काही तास उलटत नाहीत तोच जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले. फक्त एकत्र नाही तर आपल्यात काहीही बेबनाव नसल्याचं खडसे आणि महाजनांनी ठासून सांगितलं होतं. खडसे आणि महाजन बैठकीला एकत्र माझं राजकारण फडणवीस-महाजन संपवत असल्याचा आरोप करणारे एकनाथ खडसे आज महाजनांसोबत बैठकीला दिसून आले. जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक होणार आहे. त्यानिमित्तानं भाजप कार्यालयात आज महाजन आणि खडसे बाजूबाजूला बसले होते. अनेकदा विविध व्यासपीठांवर आपली नाराजी उघडपणे मांडणाऱ्या एकनाथ खडसेंनी कुणाचंही नाव मात्र घेतलं नव्हतं. पण एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळे आपलं तिकीट कापल्याचा थेट आरोप केला होता. स्वत:च्या राजकारणासाठी फडणवीस आणि महाजन यांनी आपल्याला तिकीट मिळू दिलं नाही, असा गौप्यस्फोट खडसेंनी केला होता. आपलं राजकारण संपवण्याचाच हा डाव असल्याचा गंभीर आरोपही खडसेंनी एबीपी माझाशी बोलताना केला होता. त्यावर आपण खडसेंशी बोलून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. खडसेंच्या आरोपानंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण नाथाभाऊंना चुकीची माहिती देण्यात आली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत असा कुठलाही विरोध किंवा चर्चा देखील झाली नाही. राज्यात चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, राज पुरोहित यांना देखील तिकीट मिळाले नाही. कुणीतरी सांगितले म्हणण्यापेक्षा चुकीच्या माहितीच्या आधारे असं बोलणं चुकीचं आहे. याचा सोक्षमोक्ष होणं गरजेचं आहे, असे महाजन म्हणाले होते. चुकीच्या माहितीच्या आधारे असे आरोप करणं योग्य नाही, मी याबाबत खडसे यांच्याशी बोलेन, असेही महाजन म्हणाले. खडसे यांनी व्यवस्थित माहिती घेऊन चर्चा करावी. कुठंतरी मीटिंगमध्ये चर्चा झाली किंवा आम्ही विरोध केला अशा ऐकीव गोष्टीवरून टीका करू नये. केंद्रीय निवड समितीने या सर्व लोकांचा निर्णय केला आहे. त्यामुळे हे आरोप चुकीचे आहेत, असेही ते म्हणाले होते. संबंधित बातम्या :  खडसेंकडून चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप, गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget