एक्स्प्लोर

सत्तेची लाचारी, सौदैबाजी त्यांना लखलाभ, सावरकरांच्या मुद्द्यावरुन फडणवीसांचा शिवसेनेला टोला

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसेनेने जी भूमिका मांडली, त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. याचवेळी फडणवीस यांनी सावरकरांच्या विचारांना माननाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी, शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कामांवर टीका केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. परंतु याचवेळी आम्हाला शिवसेनेच्या भूमिकेबद्दल खूप आश्चर्य वाटतं. कालपर्यंत ज्या शिवसेनेला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दल जाज्वल्य अभिमान वाटत होता. तीच शिवसेना राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर शांत आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर जी प्रतिक्रिया दिली आहे, त्याचे आम्हाला आश्चर्य वाटते.

फडणवीस म्हणाले की, शिवसेनेचे नेते म्हणत आहेत की, आम्ही जसे गांधी आणि नेहरुंना मानतो, त्याचप्रमाणे काँग्रेसनेही स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानायला हवे. शिवसेनेची ही भूमिका म्हणजे सौदेबाजी आहे. आम्ही त्यांच्या नेत्यांना मानतो म्हणून त्यांनी आमच्या नेत्यांना मानावं ही सरळ सरळ सौदेबाजी आहे. शिवसेनेची सौदेबाजी त्यांना लखलाभ.

कालपर्यंत शिवसेना सावरकरांना मानत होती. सावरकरांचा अपमान सहन करत नव्हती. सावरकरांबद्दची शिवसेनेची गेल्या पाच वर्षांतली मतं पाहा. शिवसेना सावरकरांचा अभिमान बाळगत होती. परंतु राहुल यांच्या वक्तव्यानंतर देश आणि महाराष्ट्र पेटलाय, पण शिवसेना मात्र शांत आहे. कारण शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करली आहे. हा देश राहुल यांच्या वक्तव्यामुळे त्यांना कधीच माफ करणार नाही. त्याचप्रमाणे शिवसेनेलाही माफ करणार नाही.

फडणवीस म्हणाले की, काँग्रेसला सावरकरांना मानावंच लागेल. सावरकर हे देशभक्त होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनीदेखील खूप मोठा संघर्ष केला आहे. त्यामुळे राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य हे निंदनीय आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.

प्रकरण काय आहे? झारखंडमधील एका रॅलीदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. देशातल्या महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांवरुन राहुल गांधींनी सरकारला लक्ष्य केले होते. राहुल म्हणाले होते की, भारतीय जनता पक्ष देशात मेक इन इंडिया हा संकल्प राबवणार होता. परंतु त्यांनी मेक इन इंडिया ऐवजी रेप इन इंडिया करुन ठेवलं आहे. या मुद्द्यावरुन भाजपच्या खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला. राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणीदेखील केली. त्यानतर काँग्रेसकडून काल (14 डिसेंबर) नवी दिल्लीत भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, मी माफी मागणार नाही. माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. यावरुन आता देशात मोठं वादंग उठलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget