Devendra Fadnavis: किती वेडेपणा आहे, पुन्हा यायचं असेल तर व्हिडीओ टाकून कशाला येऊ? : देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमचे मुख्यमंत्री आहेत, मी त्यांच्या पाठीशी आहे. एकनाथ शिंदे आपला कार्यकाळ पूर्ण करतील. एकही दिवस कमी नसणार, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले,

मुंबई: महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल, अशा आशयाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) व्हिडीओ भाजपकडून शेअर करण्यात आला, आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली. त्यामुळे सध्या उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार का या चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांकडून यावर टीका देखील करण्यात आली. अखेर यावर देवेंद्र फडणवीसांनी मौन सोडले. एखाद्याला यायचे असेल तर तो व्हिडीओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनच्या व्हिडीओवर (Mi Punha Yein) स्पष्टीकरण दिलं. देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमचे मुख्यमंत्री आहेत, मी त्यांच्या पाठीशी आहे. एकनाथ शिंदे आपला कार्यकाळ पूर्ण करतील. एकही दिवस कमी नसेल. एखाद्याला यायचे असेल तर तो व्हिडीओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे.एखादा व्हिडीओ पडला म्हणून विश्लेषणाची गरज नाही. आगामी निवडणुका या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली होतील.
शरद पवार काय बोलले हे मी ऐकलं नाही (Devendra Fadnavis On Sharad Pawar Press Confernece)
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली चार खासदार निवडून येतात. त्यांचा कसा धसका घेतला असे म्हणणे म्हणजे हास्यास्पद ठरेल. शरद पवार काय बोलले हे मी ऐकलं नाही त्यांच्यामुळे मी काही बोलणार नाही.
फडणवीस पुन्हा स्टेअरिंग हातात घेणार का?
भाजपच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तर महायुतीतील नेत्यांकडून सारवासारव केली जाते. मविआच्या काळात मी पुन्हा येईनवरुन तत्कालीन मविआ सरकारने फडणवीसांची फिरकी घेतली होती. भाजपच्या या जुन्या व्हिडीओमुळे नवे प्रश्न उपस्थित झालेतआता पुन्हा राजकीय भूकंप होणार का? महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर होणार का? ट्विटवरुन चर्चांना उधाण येताच साभरात ते ट्विट डीलीट केले. एकूणच, भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडीओ पोस्ट होतो काय? आणि महाराष्ट्रात सत्तेच्या तीनचाकी रिक्षात, अजितदादांना सोबत घेऊन, मागे बसलेले फडणवीस पुन्हा स्टेअरिंग हातात घेणार का? अशा चर्चांना पुन्हा उधाण आलं.
पाहा काय म्हणाले फडणवीस?
हे ही वाचा :























