एक्स्प्लोर

Sanjay Raut: "ते पुन्हा येणार असतील तर स्वागत", संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

Sanjay Raut: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरुन जावंच लागेल, असे संजय राऊत म्हणाले

मुंबई : महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल, अशा आशयाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis)  व्हिडीओ भाजपकडून शेअर करण्यात आला, आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली. त्यामुळे सध्या उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार का या चर्चांना उधाण आलं. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी मात्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांचे स्वागत करतो, असा टोला संजय राऊतांनी फडणवीसांना लगवला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमुळे  (Ajit Pawar) भाजपची प्रतिमा मलीन झाल्याचे राऊत म्हणाले. 

संजय राऊत म्हणाले, ते पुन्हा येणार असतील तर त्यांचं स्वागत करतो. कारण ते किमान कायदेशीर मुख्यमंत्री असतील. जर महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भाजपची प्रतिमा मलीन झाली आहे. एकनाथ शिंदे यांना लवकरच मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल

संजय राऊतांनी मोदींवर देखील पक्ष फोडीच्या राजकारणावरून हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले, मोदींनी एक संस्था सुरु करुन चालवून दाखवावी. पक्ष फोडल्यानंतर मोदींकडून नेत्यांना बदनामी करण्यास सुरुवात  केली आहे. आज शरद पवारांनार टीका केली उद्या बाळासाहेबांवर टीका करतील. एकनाथ शिंदेंसारखे मुंड्या हलवत बसतील.

शरद पवारांवरील टीका ही विकृती

शरद पवारांच्या टीकेवरून बोलताना संजय राऊत म्हणाले,  शरद पवारांवरील टीका ही विकृती आहे 2024 ला या विकृतीचा अंत होईल. पवार कृषीमंत्री नव्हते तेव्हापासून पवारांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं. पवारांना शेतीच्या कार्यासाठी पद्मविभूषण या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आली आहे. पवारांनी नेहमी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला आहे.  शिंदे, अजित पवारांपेक्षा गुलाम बरे अशी स्थिती करून ठेवली आहे . शरद पवारांवर टीका होत असताना अजित पवारांनी निघून जायला हवं होतं.

शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची राज्यात प्रतिमा मलीन

शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची राज्यात प्रतिमा मलीन झाली  याची सर्व माहिती केंद्राला मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल राजीनामा द्यावा लागेल.  सर्वोच्च न्यायालयाने त्या पद्धतीने निर्णय दिला आहे तो मान्य करावा लागेल.  अशा प्रकारचा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे. हे मी अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगतो, असेही राऊत म्हणाले.  

हे ही वाचा :

 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
Nagpur MLC Election 2026: निकालाची उत्कंठा शिगेला, तर नागपूर खंडपीठात मतमोजणी विरोधात याचिका; दुबार मतदार अन् मतदान प्रक्रियेवर बोट, निवडणूक रद्द करण्याची मागणीवर आज सुनावणी
पदवीधर मतदारसंघाच्या निकालाची उत्कंठा शिगेला, तर नागपूर खंडपीठात मतमोजणी विरोधात याचिका; दुबार मतदार अन् मतदान प्रक्रियेवर बोट, निवडणूक रद्द करण्याची मागणीवर आज सुनावणी
Nagpur MLC Election 2026: काँग्रेस-भाजपमध्ये 'कांटे की टक्कर', नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; नागपूर मतदारसंघात कोण विजयी गुलाल उधळणार? वाचा सविस्तर
काँग्रेस-भाजपमध्ये 'कांटे की टक्कर', नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; नागपूर मतदारसंघात कोण विजयी गुलाल उधळणार? वाचा सविस्तर

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Embed widget