एक्स्प्लोर

शरद पवारांचा वारकरी संप्रदायाशी संबंध नाही, त्यांनी निर्धमी चळवळ चालवली, पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

वारकरी संप्रदायातील 60 टक्के महाराज हे प्रतिगामी विचारांचे असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी केलं आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis on Sharad Pawar :  वारकरी संप्रदायातील 60 टक्के महाराज हे प्रतिगामी विचारांचे असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. यावरुन महाराष्ट्रात शरद पवार यांच्या विरोधात काही वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अनेकांनी शरद पवार यांच्यावर टीका देखील केली आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांनी देखील शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पवारसाहेबांनी विकासात योगदान दिलं असलं तरीही त्यांचा वारकरी संप्रदायाशी फार संबंध नाही. कारण त्यांनी निधर्मी चळवळ चालवल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. शरद पवार धर्म मानत नाहीत असेही ते म्हणाले होते.

शरद पवार धर्म मानत नाहीत

शरद पवार यांच्या सहकाऱ्यांनी निधर्मी चळवळ उभी केल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पवारसाहेबांनी विकासात योगदान दिलं असलं तरीही त्यांचा वारकरी संप्रदायाशी फार संबंध नाही. त्यांनी स्वतःही अनेक वेळा कबूल केले आहे की ते धर्म मानत नाहीत. त्यांचा सगळा पिंड निधर्मी राहिला आहे. त्यामुळे मला असे वाटते की वारकरी संप्रदायाच्या संदर्भात त्यांच्याजवळ कदाचित योग्य माहिती नसावी. किंबहुना मध्यंतरीच्या काळात हा प्रयत्न झाला की वारकरी संप्रदायांमध्ये काही लोक शिरून जो वारकरी विचार आहे त्याच्या बिलकुल विरोधात विचार मांडण्याचा प्रयत्न करत होते आणि अशा लोकांना वारकरी संप्रदायाने बाहेर काढल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 

शरद पवारांनी केलेलं वक्तव्य एकदम बरोबर : अमोल मिटकरी

वारकरी संप्रदायातील 60 टक्के महाराज हे प्रतिगामी विचारांचे असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे. यावरुन महाराष्ट्रात शरद पवारांच्या विरोधात काही वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मात्र, शरद पवारांच्या समर्थनार्थ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी पुढे सरसावलेत. त्यांनी शरद पवारांनी केलेलं वक्तव्य एकदम बरोबर असल्यास म्हटलं आहे. पवार साहेबांनी मांडलेल्या 60 टक्के आकडेवारीपेक्षा ही संख्या अधिक असल्याचा आमदार मिटकरी म्हणालेत. 

दरम्यान, या वक्तव्यावरुन शरद पवारांवर टीका करणारे काही तथागतीत महाराजांनी जेव्हा अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले तेव्हा का शांत होते असा सवाल केलाय. याबरोबरच शरद पवारांवर टीका करणाऱ्या भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget