एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

बीडमधील महादेव मुंडे हत्याप्रकरण विधानसभेत; गृहमंत्र्यांनी सांगितलं तपासात आत्तापर्यंत काय काय घडलं

बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणावर (Mahadev Munde murder case) आज सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माहिती दिली.

Devendra Fadnavis : बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणावर (Mahadev Munde murder case) आज सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माहिती दिली. मोठ्या प्रमाणात या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून 196 जणांची विचारणा केली आहे. तसेच 83 साक्षीदारांकडे तपास केले आहे. तर 286  लोकांकडे मोबाईलद्वारे तपासणी केल्याचे फडणवीस म्हणाले. याप्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  

खुल्या मैदानात हल्ला झाला, त्यामुळं साक्षीदार सापडला नाही. एक महिला दीड महिन्यांनी पुढे आल्याचे फडणवीस म्हणाले. डम डाटा आपण तपासत आहोत. महादेव मुंडे यांच्या पत्नीचा आक्रोश मी समजू शकतो. याप्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  जलील शेख हत्या प्रकरणात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आव्हाड यांनी केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ते मनसेचे कार्यकर्ते होते. नजीब मुल्ला यांनी कारस्थान रचल्याचे फिर्यादीत सांगितले आहे. यातील 9 आरोपी निश्चित झाले आहेत, यामध्ये 7 जणांना अटक करण्यात आली आहे तर दोघे फरार आहेत. याप्रकरणी पुरावे पुन्हा पडताळणार असून, पुन्हा या प्रकरणी चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. 

 वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांनी महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप 

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हत्या झाली होती. या हत्या प्रकरणाला 16 महिने उलटून गेले, तरीही आरोपी मोकाटच आहेत. पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नाही. वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांनी महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी मुंडे कुटुंबीयांची आहे. 

महिनाभरात न्याय न मिळाल्यास जीवन संपवणार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा

पतीच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी परळीतील मृत महादेव मुंडे यांच्या पत्नीने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी परळीच्या बंगल्यावरून फोन आल्याने तपास बंद केल्याचा गंभीर आरोप केला आहे. माझी मुलं बाबांना का मारलं अशी विचारणा करत असून महिनाभरात न्याय न मिळाल्यास जीवन संपवणार असल्याचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे.

वीज खरेदीमध्ये आम्ही 10 हजार कोटी वाचवू

महाराष्ट्र पहिले राज्य असेल जे शेतकऱ्यांना हरीत वीज देईल असे मुख्यमंत्री म्हणाले.  वीज खरेदीमध्ये आम्ही 10 हजार कोटी वाचवू. राज्याच्या शास्वत विकासासाठी आपण ब्लु प्रिंट तयार केली आहे. 50 टक्के वीज हरीत सोर्सच्या माध्यमातून आपण तयार करत असल्याचे मुख्यमंत्रकी म्हणाले.  पुढच्या पाच वर्षात आपण विजेचे दर कमी केलेले आहे. आपण 9.20 टक्क्याने विजेचे दर वाढ़वायचो पण आता दरवर्षी दर कमी होतील असे मुख्यमंत्री म्हणाले. 30 लाख कुटुंबाना विजेचे बिल येणार नाही.  घरगुती विजेचा वापर करणाऱ्याला आपण सोलर मुक्ती देऊ असेही ते म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

परळीच्या बंगल्यावरून फोन येताच तपास थांबवला; विष प्राशन केलेल्या ज्ञानेश्वरी मुंडेंचा सनसनाटी आरोप, वाल्मिक कराडच्या चौकशीची मागणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil Death Threat: मोठी बातमी! मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय कांचन साळवीला अटक
मोठी बातमी! मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय कांचन साळवीला अटक
Sangli crime news: सांगली हादरली! नेत्याच्या वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार, उत्तम मोहितेंनी जागेवरच प्राण सोडले
सांगली हादरली! नेत्याच्या वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार, उत्तम मोहितेंनी जागेवरच प्राण सोडले
Bhaskar Jadhav & Ramdas Kadam: नेतेच बाया नाचवून पैसे जमा करत असतील तर.... भास्कर जाधवांची रामदास कदमांवर बोचरी टीका
नेतेच बाया नाचवून पैसे जमा करत असतील तर.... भास्कर जाधवांची रामदास कदमांवर बोचरी टीका
Pune News: मोदी सरकारची पुणेकरांना मोठी भेट; पुण्याला 1000 ई-बस मंजूर, बस खरेदीवर अवजड उद्योग मंत्र्यांचे शिक्कामोर्तब, मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश
मोदी सरकारची पुणेकरांना मोठी भेट; पुण्याला 1000 ई-बस मंजूर, बस खरेदीवर अवजड उद्योग मंत्र्यांचे शिक्कामोर्तब, मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Alliance Talks : काका-पुतणे एकत्र येणार? Pimpri-Chinchwad मध्ये BJP ला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींची तयारी.
Superfast News Updates : 8 च्या अपडेट्स : 8 AM : 12 NOV 2025 : ABP Majha
Sena vs Sena: 'शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको', Uddhav Thackeray कणकवलीतील आघाडीच्या प्रस्तावावर नाराज
Delhi Car Blast: Red Fort जवळील स्फोट आत्मघातकी हल्ला नाही, NIA करणार तपास
Compensation Disparity: 'दोन्ही तालुक्यांमध्ये इतकी तफावत कशी?', शेतकरी Ganesh Wadekar यांचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Death Threat: मोठी बातमी! मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय कांचन साळवीला अटक
मोठी बातमी! मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय कांचन साळवीला अटक
Sangli crime news: सांगली हादरली! नेत्याच्या वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार, उत्तम मोहितेंनी जागेवरच प्राण सोडले
सांगली हादरली! नेत्याच्या वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार, उत्तम मोहितेंनी जागेवरच प्राण सोडले
Bhaskar Jadhav & Ramdas Kadam: नेतेच बाया नाचवून पैसे जमा करत असतील तर.... भास्कर जाधवांची रामदास कदमांवर बोचरी टीका
नेतेच बाया नाचवून पैसे जमा करत असतील तर.... भास्कर जाधवांची रामदास कदमांवर बोचरी टीका
Pune News: मोदी सरकारची पुणेकरांना मोठी भेट; पुण्याला 1000 ई-बस मंजूर, बस खरेदीवर अवजड उद्योग मंत्र्यांचे शिक्कामोर्तब, मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश
मोदी सरकारची पुणेकरांना मोठी भेट; पुण्याला 1000 ई-बस मंजूर, बस खरेदीवर अवजड उद्योग मंत्र्यांचे शिक्कामोर्तब, मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश
Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Bihar Exit Poll : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Embed widget