एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांबद्दल लवकरच गौप्यस्फोट करणार, फडणवीसांचे आव्हान

Devendra Fadnavis : फडणवीस सरकारी वकील प्रवीण चव्हाणांबद्दल लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले आहे.

Devendra Fandnavis : गिरीश महाजनांवर (Girish Mahajan) ज्या प्रकरणात गुन्हा नोंद आहे. त्या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून रेकॉर्ड केलेले व्हिडीओ देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत समोर आणले.  प्रवीण चव्हाण हे गिरीश महाजन यांना बनावट गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस विधिमंडळात यांनी केला. यानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी त्यांची बाजू एबीपी माझावर मांडली. त्यावर आज फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये ते सरकारी वकील प्रवीण चव्हाणांबद्दल लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले आहे. 

सरकारी वकील प्रवीण चव्हाणांबद्दल लवकरच गौप्यस्फोट करणार

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेले आरोप फेटाळून लावले. या व्हिडीओंमागे देखील जळगाव कनेक्शन असल्याचं म्हटलं आहे. प्रवीण चव्हाणांच्या आरोपांवर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. एवढे दिवस प्रवीण चव्हाण कुठे होते? असा फडणवीसांनी सवाल केलाय. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांबद्दल लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. प्राप्त झालेल्या तक्रारीची खातरजामा करून माहिती देईन असं सांगत प्रवीण चव्हाणांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीवर फडणवीसांनी उत्तर दिलंय. तसेच प्राप्त झालेल्या तक्रारीची खातरजमा करून माहिती देईन. क्लिप खोट्या ठरवण्याचा कितीही प्रयत्व केला तरी आम्ही पूर्ण तयारी केलीय. असे उत्तर फडणवीसांनी दिले आहे.

माझ्या माहितीचे स्रोत कुणीही मला विचारू शकत नाही,

पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, विरोधी पक्ष नेत्याच्या अधिकारातून सत्ताधाऱ्यांचे घोटाळे मी बाहेर काढू शकतो आणि माझ्या माहितीचे स्रोत कुणीही मला विचारू शकत नाही, असा नियम आहे. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकारच्या गृहमंत्रालयातील महाघोटाळ्यासंदर्भात मला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहे. उद्या बीकेसी येथील पोलीसांसमोर मी हजर होईन, त्यांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे देईन, असे आश्वासन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले आहे. 

स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड -  प्रवीण चव्हाण

चव्हाण यांनी म्हटलं आहे की, फडणवीसांनी पुढे आणलेल्या व्हिडीओमध्ये वाक्यांची मोडतोड करण्यात आली असून सर्व रेकॉर्डिंग समोर येण्याची गरज आहे, असं प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मूळचा जळगावचा असलेला तेजस मोरे नावाचा तरुण अशील म्हणून आपल्याकडे आला आणि त्याने हे स्टिंग ऑपरेशन केलं आहे. यातून या स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड होतं आहे, असंही प्रवीण चव्हाण म्हणालेत.  प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं की, या प्रकरणात पुरावे आहेत म्हणून कारवाई होतेय.  माझे रेकॉर्डिंग मॅनिप्युलेट करुन वापरण्यात आलं आहे. व्हिडीओ आणि ऑडिओ वेगळे आहेत.  वाक्ये अर्धवट वापरण्यात आली आहेत. माझ्या ऑफिसात अशील म्हणून येणाऱ्या तेजस मोरेने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यासाठी त्याने समोरच्या काचेच्या भिंतीवर लावायला घड्याळ भेट दिले आणि त्यात छुपा कॅमेरा बसवला. असे प्रवीण चव्हाण म्हणाले होते.

या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी

चव्हाण यांनी म्हटलं की, तेजस मोरे हा तुरुंगात होता आणि जामिन मिळवण्यासाठी माझ्याकडे येत होता.  तेजस मोरे हा मूळचा जळगावचा आहे आणि जळगावमधूनच हे सर्व करण्यात आलंय. तेजस मोरेला अनेकांची साथ आहे. मी चालवत असलेल्या केसेसमधे जे आरोपी तुरुंगात आहेत त्यांचीही त्याला साथ आहे.  मी कुणाचेही नाव घेतलेले नाही. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असं देखील प्रवीण चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं होतं.

Maharashtra Budget Session: फडणवीसांनी वाचलेल्या भाषणातील शब्द अन् शब्द जशाच्या तसा; वाचा संपूर्ण भाषण

Sanjay Raut : सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल, संजय राऊतांचे फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget