ABP Majha Zero Hour : स्टेटसवरून राज्यात घडणाऱ्या दंगलींमागे PFI चा हात; देवेंद्र फडणवीसांची 'झीरो अवर' शोमध्ये माहिती
Devendra Fadanvis On ABP Majha Zero Hour: गेल्या काही काळात राज्यात ज्या काही दंगली घडल्या आहेत त्यामागे PFI चा हात असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मुंबई: राज्यातील कोल्हापूर, औरंगाबाद आणि आणखी काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही काळात व्हॉट्सअप स्टेटस ठेवण्यावरून दंगली झाल्या त्यामागे पीएफआय या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावर एनआयएकडून अधिकचा तपास सुरू असल्याचंही ते म्हणाले. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. एबीपी माझाच्या 'झीरो अवर' शोच्या (Zero Hour) पहिल्या भागाच्या निमित्ताने त्यांनी संवाद साधला आणि या शोला शुभेच्छाही दिल्या.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पीएफआय संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या छापेमारीतून काही कादगपत्रं हाती लागली आहेत. ती देशविरोधी कृत्यांची आहेत. 2047 सालापर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचा उद्देश त्यांच्या असल्याचं स्पष्ट झालंय. यासाठी अल्पसंख्यांक तरुणांची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. वेगवेगळ्या आऊटफिट्समध्ये पीएफआय काम करत असून त्यामध्ये एनजीओ आणि काही फ्रंटल संघटनांच्या नावावर हे केलं जात आहे. पुण्यातील प्रकरणावरुन ही गोष्ट समोर आली. एनआयएकडे जसजशी माहिती येत आहे तसतसे त्यावर कारवाई सुरू आहे."
महाराष्ट्रात गेल्या काही काळात ज्या काही गोष्टी घडल्या त्यामध्ये पीएफआयचा हात असल्याचं समोर आलं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, "राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये व्हॉट्सअॅपच्या स्टेटसवरून दंगली घडल्या, अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये पीएफआयचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये हायटेकचा वापर करण्यात येत असल्याचं दिसून येतंय. पुण्यामध्ये जे मोड्यूल सापडलं आहे त्याचे संबंध देशभर असल्याचं स्पष्ट झालं आहे. देशामध्ये अशा प्रकारच्या दहशतवादी संघटना निर्माण करून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे."
शासन, प्रशासन किंवा इतर शासकीय संघटना असतील, त्यांना काम करताना काही मर्यादा येत असून लोकांनी सजग राहण्याचं आणि पोलिसांना मदत करण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी यांनी केलं. ते म्हणाले की, "लोकांना काही संशयित हालचाली आढळल्यास किंवा संशयित व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावं. भारत आता एक आर्थिक महासत्ता होऊ घातला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संदर्भ बदलणार आहेत. म्हणूनच जगाच्या पाठीवरील काही देशांना हे बघवत नाही. त्यामुळे दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून भारतात अशांतता निर्माण करायचं आणि नंतर अल्पसंख्यांकांवर हल्ले होतात अशी बदनामी करायची त्यांचा डाव आहे."
आजपासून झीरो अवर हा शो सुरू
'एबीपी माझा' (Abp Majha) आणि मराठी माणूस हे नातं काही नवं नाही. गेल्या सतरा वर्षांपासून तमाम मराठी प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच 'एबीपी माझा'नं सातत्यपूर्ण नवे प्रयोग केले आहेत. सध्या चुकीच्या बातम्या आणि बातम्यांच्या नावाखाली मनोरंजनाचा खेळ सतत सुरु असतो. यामुळे तुमचे आणि तुमच्या हक्काचे प्रश्न हे बाजूला राहतात. पण आता 'एबीपी माझा' तुमच्याच माध्यमातून तुमच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहे. माझाच्या या कार्यक्रमात आता फक्त आमचे प्रतिनिधीच नाही तर तुम्ही देखील सहभागी होणार आहात. एबीपी माझाचा 'झीरो अवर' हा कार्यक्रम 14 ऑगस्ट पासून तुमच्या भेटीला येत आहे. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7.56 ची वेळ आता ही माझाच्या प्रेक्षकांची असणार आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नियम आणि अटी
18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तीच या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच तुमच्या सोशल मिडियावरील नावासकट तुमच्या पोस्ट, ठिकाण आणि छायाचित्रं देखील प्रसारित करण्यासाठी तुम्ही ABP Network Private Limited (“ABP”) ला अधिकृत परवानगी देता आहात. नियम व अटी लागू.
ही बातमी वाचा: