एक्स्प्लोर
Advertisement
देसी मी टू : लैंगिक गैरवर्तनावेळी तरुणींनी घातलेल्या कपड्यांचं प्रदर्शन
लैंगिक गैरवर्तन झालं, त्यावेळी तरुणींनी घातलेल्या पोशाखांचं प्रदर्शन डोळ्यात अंजन घालणारं आहे.
नागपूर : समाजात टप्प्याटप्प्यावर महिलांचा गैरफायदा घेणारे किती किळसवाणे शिकारी लपले आहेत, याचं नकोसं दर्शन नागपुरात 'देसी मी टू' या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालं. युवक क्रांती दलाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेक मुलींनी रोजच्या जीवनात एक-दोनदा नाही, तर सतत 'तसे' अनुभव येत असल्याचं सांगितलं. लैंगिक गैरवर्तन झालं, त्यावेळी तरुणींनी घातलेल्या पोशाखांचं प्रदर्शन डोळ्यात अंजन घालणारं आहे.
मुली किंवा महिला, ज्या प्रकारचे कपडे घालतात, त्यामुळे त्यांच्यावर अतिप्रसंग ओढवतो, असे अकलेचे तारे तोडणाऱ्यांना लाज वाटावी, म्हणून हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यामध्ये शाळेच्या युनिफॉर्मपासून सलवार कमीजचा समावेश आहे, पण एकही तोकडा ड्रेस नाही.
प्रत्येक ड्रेसवर अत्याचाराचे किस्सेही लागलेले होते. ऑटो घेऊन कॉलेजला जात असताना सतत आरशात न्याहाळत असलेला रिक्षाचालक. मोबाइल नंबर दे, मला चष्मा लावलेल्या मुली खूप आवडतात, हे म्हणत उतरु देत नाही, असा किस्सा एका ठिकाणी लिहिला आहे.
लठ्ठ शरीराच्या एका मुलीने तर आपल्यासोबत घडलेल्या आठ वाईट कहाण्या लावल्या होत्या. अगदी कार्यक्रमस्थळी येतानाही तिच्याबरोबर असाच प्रकार घडला. सर्वात घृणास्पद म्हणजे बुरखा घालून तरुणीने सांगितलेली कहाणी. बहिणीचं घर मोडेल म्हणून जिजा जे करतो ते करु दे सांगणारी आई! या ड्रेससोबत लागलेल्या अनेक कहाण्यांचा शेवट घरच्यांनी कसं गप्प बसायला सांगितलं, यानेच होतो.
मंदिरात पुजाऱ्याने छेडल्यावर, उगाच तमाशा नको, तुमच्याबरोबर आमचीही बदनामी होईल, असं शेजारीपाजारी मुलगी आणि आईला सांगतात. समाज म्हणून दुतोंडी, दुटप्पी जगण्याची आपल्याला सवयच झाली आहे. फक्त फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरवर विरोध करत असलो, तरी घराघरात 'मी टू' बोलण्यावर दबाव टाकण्याचंच वातावरण जोपासलं जातं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement