एक्स्प्लोर
Advertisement
सुप्रिया सुळेंविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा तरुणाला चोप
कोल्हापुरातील तरुणाने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला घरी जाऊन चोप दिला
मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. कोल्हापुरातील अक्षय तांबवेकर या तरुणाने एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पोस्टमध्ये सुप्रिया सुळेंविषयी अपशब्द वापरले होते.
ईव्हीएम नको, अशी आमची भूमिका आहे, या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याविषयीच्या बातमीची पोस्ट संबंधित वृत्तवाहिनीच्या फेसबुक अकाऊंटवरुन करण्यात आली होती. त्याखाली कमेंटमध्ये अक्षयने सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते त्याच्या घरी पोहचले आणि त्याला चोप दिला.
Sharad Pawar Exclusive | मोदी सत्तेत आले, तरी सरकार 13 दिवसात पडेल, पवारांचं भाकित
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अक्षयला कॅमेरासमोर माफी मागण्यास सांगितलं. त्यानंतर सुप्रिया सुळेंची लेखी माफीही मागून घेतली. 'सोशल मीडियावर केलेल्या चुकीच्या पोस्टबद्दल जाहीर माफी मागत आहे. यापुढे कोणत्याही महिलेविषयी अपशब्द वापरणार नाही. मी माझं अकाऊण्ट डिलीट केलं आहे, याबाबत जी कारवाई होईल त्याला मी जबाबदार असेन' असं पत्र त्याच्याकडून लिहून घेतलं. EVM SCAM | ईव्हीएमबद्दल शंका नसल्याचं अजित पवारांचं मोठं विधान, सुप्रिया सुळेंचं मात्र परस्पर विरोधी विधान सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएमवर विश्वास नसल्याचा पुनरुच्चार केला. निवडणुकांमध्ये ईव्हीएम नकोच, अशी राष्ट्रवादीची भूमिका राहिली असल्याचं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं.EVM | ईव्हीएमबाबत कोणतीही शंका नाही, अजित पवारांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला
दुसरीकडे, ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यात भाजप सरकार गेलं नसतं. पण काहींच्या मनात शंका आहे. आता यावर कोर्टाने निर्णय दिला आहे, असं म्हणत अजित पवारांनी काका शरद पवारांनाच अप्रत्यक्षरिता टोला लगावला.बारामतीची जागा भाजपने जिंकल्यास लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल : पवार
जर बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विस्फोटक मुलाखतीत केलं होतं.शरद पवारांविषयी बेताल वक्तव्य, चारोळीकार चंद्रशेखर गोखलेंचा माफीनामा
यापूर्वी चारोळीकार चंद्रशेखर गोखलेंनी शरद पवारांविषयी आक्षेपार्ह कमेंट केली होती. भाजपने बारामतीची जागा जिंकल्यास लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असा दावा शरद पवार यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत केला होता. या वक्तव्याची अनेक प्रसारमाध्यमांनी बातमी केली होती. अशाच एका वेबसाईटने फेसबुकवर शेअर केलेल्या बातमीच्या पोस्टवरील कमेंटमध्ये चंद्रशेखर गोखलेंनी टवाळपणे कमेंट केली. 'बारामती जिंकण्याच्या भाजपच्या दाव्यानंतर शरद पवारांचं धक्कादायक विधान' असा संबंधित बातमीचा मथळा होता. त्यावर 'मी वाचलं धक्कादायक निधन देव त्यांच्या आत्म्याला सॉरी सॉरी देव त्यांना उदंड आयुष्य देवो' असं भाष्य चंद्रशेखर गोखले यांनी केलं होतं. गोखलेंच्या कमेंटनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उमटली होती. त्यानंतर, 'मी चंद्रशेखर गोखले मनापासून तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. पवार साहेबांबद्दल असे विधान करायची खरच मला गरज नव्हती तरी माझ्या हातून ही आगळीक घडली प्लीज समजून घ्या' अशा शब्दात चंद्रशेखर गोखलेंनी माफी मागितली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement