एक्स्प्लोर

सर्वधर्मिय सण, उत्सव घरातच साजरे करा, बाहेर पडाल तर कठोर कारवाई : उपमुख्यमंत्री अजित पवार

महावीर जयंती, हनुमान जयंती, ‘शब्ब-ए-बारात’साठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मुंबई : ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे, त्यासाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं. सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याचरात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यावर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मीय नागरिकांना केलं आहे. राज्यात कोरोनारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज ती साडेपाचशेच्या आसपास आहे. ज्या भागात रुग्ण आढळत आहेत, ते भाग सीलबंद केले जात आहेत. डॉक्टर, पोलिस, पालिका कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. रेशनदुकानांमधून गरीबांना अन्नधान्याचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे. बहुतांश नागरिक घरात थांबून लढ्यात योगदान देत आहेत. या संपूर्ण लढ्याला, रस्त्यावर फिरणाऱ्या, गर्दी करणाऱ्या मोजक्या मंडळींमुळे धक्का बसत आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर फिरु नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. कोरोनाविरुद्धची लढाई देश, देशवासियांच्या अस्तित्वाची लढाई असल्यानं नियम, कायदे, आदेशांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई येणाऱ्या काळात केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. कोरोनाविरुद्धचा लढा हा मानवता आणि विज्ञानवादाच्या दृष्टीकोनातूनच जिंकता येईल. त्यासाठी विज्ञानाच्या कसोटीवर निर्णय घ्यावे लागतील. पुरोगामी महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, यापूर्वीही अनेक संकटं महाराष्ट्रानं परतवून लावली आहेत. कोरोनाच्या संकटांचं गांभीर्य ओळखून संपूर्ण महाराष्ट्र, आपण सर्वजण, एकजुटीनं, शहाणपणानं, घरातंच थांबून, कोरोनाचं संकट परतवून लावूया, असा निर्धार उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 39 आमदार अशोक खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील, त्या आमदारांच्या राजीनाम्यासाठी  माकप आंदोलन करणार 
राज्यातील 39 आमदार अशोक खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील, त्या आमदारांच्या राजीनाम्यासाठी  माकप आंदोलन करणार 
अलिबाग वडखळ मार्गावर भीषण अपघात, आयशर टेम्पोची कंटेनरला जोराची धडक, एकाचा जागीच मृत्यू
अलिबाग वडखळ मार्गावर भीषण अपघात, आयशर टेम्पोची कंटेनरला जोराची धडक, एकाचा जागीच मृत्यू
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
अब्जाधिश सलमान खानच्या पायात फाटके बूट, व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांनी शोधून काढली ब्रँडेड किंमत
अब्जाधिश सलमान खानच्या पायात फाटके बूट, व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांनी शोधून काढली ब्रँडेड किंमत

व्हिडीओ

Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Embed widget