एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : तुम्ही मला संपवू शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य नैराश्येतून, फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कालचे भाषण हे निराशेचं भाषण होतं. त्यांनी नैराश्येतून वक्तव्य केलं असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कालचे भाषण हे निराशेचं भाषण होतं. त्यांनी नैराश्येतून वक्तव्य केलं असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. तुम्ही आमच्यासोबत निवडणूक लढवून आमच्याच पाठित खंजीर खुपसला, तुमच्यात हिंमत होती तर त्यावेळीच तुम्ही का राजीनामे दिले नाहीत? असा सवाल फडणवीस यांनी केला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अडीच वर्षात मला ते संपवू शकले नाहीत. यापुढेही तुम्ही मला संपवू शकणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.

अडीच वर्षात तुम्ही मला संपवू शकले नाहीत...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गटप्रमुखांच्या मेळाव्यात भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी काल केलेलं भाषण निराशाजनक होतं असे फडणवीसांनी म्हटलं आहे.  ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत निवडून आला नव्हता, तुम्ही आमच्यासोबत मोदीजींचा फोटो लावून निवडणूक लढवली होती असेही ते म्हणाले. आम्ही लिगली निवडून आलो आहोत. मात्र, तुम्ही आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे फडणवीस म्हणाले. तेव्हा का राजीनामे दिले नाहीत असा सवाला त्यांनी केला. उद्धव ठाकरे असेही म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांची शेवटची निवडणूक आहे. मी त्यांना एवढेच सांगतो की 'मुद्दई लाख बुरा चाहे, तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे लिखा होता है' तुम्ही 2019 मध्ये ही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस एनसीपी आणि शिवसेना तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अडीच वर्षात मला संपवू शकले नाहीत. यापुढेही तुम्ही मला संपवू शकणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.

NIA च्या कारवाईवर बोलणं योग्य नाही

राज्यात सुरु असलेल्या एनआयएच्या छापेमारीबाबत देखील फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, लवकरच याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळेल. जी काही छापेमारी सुरू आहे ती कॉर्डीनेटेड स्वरुपाची ॲक्शन आहे. त्या ॲक्शनवर आता बोलणं योग्य नाही, योग्य वेळी मी बोलेल असे फडणवीस यावेळी म्हणाले. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे

हिमंत असेल तर महिनाभरात महानगरपालिकेच्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका घेऊन दाखवा असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. तसेच देवेंद्र फडणवीसांची ही शेवटची निवडणूक आहे. तर आपली ही पहिली निवडणूक आहे, असं समजून निवडणुकांना सामोरं जा असे वक्तव्यही त्यांनी केलं होतं.  मुंबईवर सध्या गिधाड फिरत आहेत. लचके तोडणारी औलाद फिरत असल्याचा घणाघात त्यांनी केला होता. अमित शहा यांनाही उद्धव ठाकरे यांनी ललकारताना तुम्ही जमीन दाखवाच आम्ही तुम्हाला अस्मान दाखवू, असे जाहीर आव्हान दिलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal Crime: खळबळजनक! लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर, पिडीतेच्या कुटूंबियांची पोलीस ठाण्यात तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; यवतमाळच्या दिग्रसमधील घटना
खळबळजनक! लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर, पिडीतेच्या कुटूंबियांची पोलीस ठाण्यात तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; यवतमाळच्या दिग्रसमधील घटना
Vijay Kumbhar On Bhimashankar Karjat Torrent Power Project: भीमाशंकर जंगलात 34 हजार नव्हे, 90 हजार झाडांची कत्तल होणार; महाराष्ट्रात 23 ठिकाणी वृक्षतोड, विजय कुंभार यांच्या दाव्याने खळबळ, यादीच देऊन टाकली! 
भीमाशंकर जंगलात 34 हजार नव्हे, 90 हजार झाडांची कत्तल होणार; महाराष्ट्रात 23 ठिकाणी वृक्षतोड, विजय कुंभार यांच्या दाव्याने खळबळ, यादीच देऊन टाकली! 
बीडमध्ये पाणी संकटाची धोक्याची घंटा! 11 तालुक्यातील 126 विहिरींच्या पाणीपातळीचा धक्कादायक रिपोर्ट; नेमकी परिस्थिती काय?
बीडमध्ये पाणी संकटाची धोक्याची घंटा! 11 तालुक्यातील 126 विहिरींच्या पाणीपातळीचा धक्कादायक रिपोर्ट; नेमकी परिस्थिती काय?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Gokul Chairman Election 2026: फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
Embed widget