एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोदींच्या मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय : पृथ्वीराज चव्हाण
नरेंद्र मोदींच्या मित्रांकडे असणारा काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट झालं आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मित्रांकडे असणारा काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट झालं आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
नोटबंदीच्या दुर्दैवी निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. सरकार नोटबंदीच्या सर्व निर्णयावर श्वेत पत्रिका काढून माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. एकाही नियतकालिकामधून नोटबंदीच समर्थन केलेलं नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी राफेल मुद्द्यावर देखील भाष्य केले. राफेल 500 ते 550 कोटी ठरली होती, ही 500 कोटीची किमंत 1676 कोटी कशी झाली? असा सवाल देखील त्यांनी केला. राफेलची चौकशी होऊ नये म्हणून रात्रीत सीबीआय अधिकारी हटवले असल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदी स्वतः या प्रकरणात अडकत आहेत. या प्रकरणातून मोदी सुटू शकत नाहीत, असेही चव्हाण म्हणाले.
न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणातील महत्वपूर्ण दोन साक्षीदारांचा संशयास्पद मृत्यू झाला असून सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी एसआयटी नेमून चौकशी करावी, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
Advertisement