एक्स्प्लोर

Maharashtra Corona Crisis: राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना फ्रँटलाईन वर्कर जाहीर करा, भाजपची मागणी

अनेक वीज कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा जीवही गेलाय आणि त्याच वीज कर्मचाऱ्यांना सरकार फ्रंटलाइन वर्कर मानायला तयार नाही. हे दुर्दैवी असून सरकारची असंवेदनशीलता दाखवणारी कृती असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

नागपूर : सरकारने वीज कर्मचाऱ्यांना आजच्या आज फ्रँटलाईन वर्कर जाहीर करावे, अशी मागणी भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. जे वीज कर्मचारी कोरोना काळात रस्त्यावर उतरून, रुग्णालयांच्या आयसीयूमध्ये जाऊन वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये अनेक वीज कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा जीवही गेलाय आणि त्याच वीज कर्मचाऱ्यांना सरकार फ्रंटलाइन वर्कर मानायला तयार नाही. हे दुर्दैवी असून सरकारची असंवेदनशीलता दाखवणारी कृती असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील कोणताही मंत्री लोकांच्या प्रश्नांबद्दल गंभीर नाही. विद्यमान ऊर्जा मंत्री नितीन राऊत तर वीज कर्मचाऱ्यांच्या अत्यंत हिताचा मुद्दा कॅबिनेटमध्ये ठेवण्यातही अपयशी ठरले आहेत, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

फ्रँटलाईन वर्करचा दर्जा मिळावा या मागणीसाठी आज वीज कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून लवकरच या मुद्द्यावर अनिश्चितकलीन संपाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करत टीका केली आहे.

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भातही महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही

दुसऱ्या बाजूला विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भातही महाविकास आघाडी सरकार गंभीर नसल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातील धानाचा बोनस अद्याप देण्यात आलेला नाही. धानावर बोनस देण्याची अनेक वेळा घोषणा करून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी श्रेय लाटले, मात्र बोनस शेतकऱ्यांना आजवर मिळाला नाही याची काळजी मात्र या नेत्यांनी केली नाही. एवढेच नाही तर उन्हाळी धानासाठी अद्याप ही पर्यंत खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे काही दिवसांनी शेतकरी कमी भावात आपला धान व्यापाऱ्यांना विकण्यास मजबूर होतील आणि पुढे तोच धान व्यापारी जास्त समर्थन मुल्यावर सरकारला विकतील अशी शंका ही बावनकुळे यांनी व्यक्त केली.

विद्यमान सरकारमधील नेते धानाच्या खरेदी संदर्भात शेतकऱ्यांचे नाही तर व्यापाऱ्यांचे हित जपत असल्याचे गंभीर आरोप ही त्यांनी केले. पूर्व विदर्भातील धान उत्पादक क्षेत्रातून निवडून जाणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा व्यथेबद्दल गंभीर नाही. उलट ते रोज केंद्र सरकारवर टीका करत असतात नाना पटोले यांनी मोदींवर टीका करण्याऐवजी आपल्या मतदारसंघातील धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा पहावी असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget