लवकरच शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याचा निर्णय, मंत्री भुसेंची माहिती, वर्षभरात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुधारणा होणार
राज्यातील जिल्हा परिषद शाळांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. या शाळांची लवकरात लवकर सुधारणा करण्याचा निर्णय घेऊ असे मंत्री दादा भुसे म्हणाले.

Dada Bhuse : राज्यातील जिल्हा परिषद शाळांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. या शाळांची सुधारणा लवकरात लवकर करण्याबाबत शिक्षण विभागाच्या स्तरावरुन प्रयत्न करुन पुढील वर्षभरात जिल्हा परिषदेच्या शाळांची सुधारणा झाल्याचे पाहायला मिळेल असे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. मंत्री दादा भुसे हे आज धुळे दौऱ्यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत दादा भुसे यांनी जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या कार्याचा आढावा जाणून पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांची अशैक्षणिक कामे लवकरच कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात येईल असेही भुसे म्हणाले.
विद्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत देण्यात घेणारे गणवेश हे लवकरात लवकर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जातील. यंदा 15 जूनला शाळा उघडल्यावर विद्यार्थी गणवेशात आलेले दिसतील अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधीही लागल्या तर या निवडणुकामध्ये महायुती मोठ्या संख्येने विजयी होईल असा विश्वास देखील दादा भुसे यांनी व्यक्त केला. शिक्षकांना अशैक्षणिक कामे मोठ्या प्रमाणावर लावण्यात येतात. मात्र, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देणे हे शिक्षकांचे प्रथम कर्तव्य आहे. त्यांची अशैक्षणिक कामे लवकरच कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात येईल अशी माहिती देखील दादा भुसे यांनी दिली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था फार वाईट आहे. अनेक शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रोजेक्टर नाहीत. जिथं प्रोजेक्टर आहेत तिथं मात्र, इंटरनेटची व्यवस्था नाही. शाळेच्या भिंती तर कधीही कोसळतील अशी परिस्थिती आहे. त्यातच लहान मुले जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे घेत आहेत. या शाळेला इमारत मिळावी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळे साहित्य मिळावे, अशी मागणी वारंवार पालक करताना दिसत आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांचे मुलं या सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेतात. खरंतर सरकारी शाळा स्पर्धेच्या युगात टिकून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असले तरी मुलं विविध ठिकाणी शाळेचे नाव उंचावत आहे.
महत्वाच्या बातम्या:
CBSE Pattern : पहिलीसाठी CBSE पॅटर्न; शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेनंतर शिक्षक अन् पालक गोंधळात, 'या' प्रश्नांबाबत अजूनही संभ्रम
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























