एक्स्प्लोर

दाऊदच्या शार्पशूटरला बेड्या, शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त

डिझेलचे 1 हजार रुपये न भरताच दाऊदचा शार्पशूटर बादशाहने पंपावरुन पोबारा केला. याचीच तक्रार पंपमालकाने पोलिसांना केली. आणि इथेच त्याचा डाव फसला.

नाशिक : दाऊदला मुंबईत पुन्हा घातपात करायचा आहे? दाऊदच्या हल्ल्याचा कट दोन पोलिसांनी उधळला? शस्त्रास्त्राचा प्रचंड साठा दाऊदचा खास शार्पशूटर बादशाहकडून हस्तगत करण्याचा पराक्रम चांदवड पोलिसांनी केला आहे. या साठ्यात 45 रायफल आणि रिव्हॉल्व्हर, हजारो जिवंत काडतुसं आणि लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पण या कारवाईचा घटनाक्रम या शस्त्रास्त्रांइतकाच थरारक होता... काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नाशिकमधल्या टेहरेच्या पेट्रोल पंपावर बादशाह आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या बोलेरोमध्ये डिझेल भरलं. पण डिझेलचे 1 हजार रुपये न भरताच त्यांनी पंपावरुन पोबारा केला. याचीच तक्रार पंपमालकाने पोलिसांना केली. आणि इथेच बादशाहचा डाव फसला. चांदवड पोलिसांच्या दोन कॉन्स्टेबलनी तातडीने चांदवडच्या टोलनाक्यावर धाव घेतली आणि ज्या लेनमध्ये बादशाहची गाडी होती, त्याच लेनच्या तोंडावर पोलिसांनी आपली गाडी आडवी लावली. त्यामुळे बादशाहला ना मागे जाता आलं, ना पुढे. नाईलाजानं बादशाह गाडीतून उतरला आणि पोलिसांनी गाडीचा ताबा घेतला. त्यावेळी पोलिस आणि बादशाहमध्ये धक्काबुक्कीही झाली. आपण पोलिसांच्या जाळ्यात पुरते फसलो आहोत, हे लक्षात येताच बादशाहने पोलिसांना 10 हजारांचं आमिष दाखवलं. पण दोन्ही पोलिसांना बादशाहच्या वर्तनाचा संशय आला. त्याचवेळी या दोन पोलिसांच्या मदतीला पोलिसांचं चेतक पथक आलं आणि मग पोलिसांनी गाडीची झाडाझडती घेतली. तेव्हा बादशाहनं आपल्या गाडीत लपवलेलं शस्त्रास्त्रांचं घबाड उघडकीस आलं. उत्तर प्रदेशातल्या बांदामधून बादशाहने शस्त्रास्त्रांचं दुकान लुटलं होतं. त्यात अडीच हजारांपेक्षा जास्त रायफली आणि हजारो जिवंत काडतुसं लंपास केली होती. पण शस्त्रास्त्रांचा हा साठा मुंबईत पोहोचवण्यासाठी बादशाहनं खास प्लॅनिंगही केलं होतं. आधी बादशाहने ओएलएक्सवरुन एक गाडी विकत घेतली. त्यात विशिष्ट कप्पे करुन शस्त्रास्त्रे लपवली. प्रत्येक जिल्ह्याच्या हद्दीत जाण्याआधी तो त्या त्या जिल्ह्याची नंबरप्लेट बदलायचा. हॉटेलमधल्या मुक्कामासाठी त्याने बनावट ओळखपत्रेही तयार केली होती. इतकंच नव्हे, तर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने 12 वर्षांच्या एका मुलाला गाडीत समोर बसवलं होतं. पण प्रश्न असा आहे, की बादशाह या शस्त्रास्त्राच्या साठ्यासह मुंबईच्या दिशेने का निघाला होता? बादशाहनं लुटलेल्या शस्त्रास्त्रांमधल्या साठ्यापैकी उर्वरित साठा कुठे आहे? सुपाऱ्या घेऊन आतापर्यंत 60 लोकांना ठार मारणारा बादशाह सापडल्यानं राज्यातल्या एटीएस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी चांदवडमध्ये दाखल झाले आहेत. गुप्त ठिकाणी वॉर रुम तयार करुन या घटनेचा आढावा घेतला जात आहे. दाऊदला मुंबईत पुन्हा एकदा 26-11 सारखा हल्ला करायचा होता का? याचाही धांडोळा घेतला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 05 November 2024भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget