एक्स्प्लोर

नागरिकांना अत्याधुनिक डिजिटल आरोग्य सेवा मिळणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

World Economic Forum : दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागीदारी, राज्यातील पायाभूत आरोग्य सुविधांत क्रांती होईल, असे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

मुंबई : राज्यातील 12 कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्ण, जलद आणि सुलभ आरोग्यसेवा मिळणार आहे. यासंदर्भात स्वित्झर्लंडमधील दावोस येथे (davos World Economic Forum) हिताची एमजीआरएम नेटशी (hitachi mgrm net ltd) भागीदारी  करण्यात आली असून त्यामुळे आरोग्य क्षेत्रात परिवर्तन होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

एमएसटीएआर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यासाठी  कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर काल चर्चा केली. एमएसटीएआर हा एक नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म असून आयुष्मान भारत डिजिटल मिशन अनुरूप डिजिटल आरोग्य सेवा राज्यातील जनतेला देण्याची सुविधा यामध्ये आहे.

आधुनिक आरोग्य सेवा मिळेल

या भागीदारीमुळे राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती होईल. नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा मिळेल. शिवाय प्रत्येकाचे आरोग्य रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यात येईल. रिमोट पद्धतीने वैद्यकीय चाचण्या व तपासणी करण्यात येतील. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की,अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट्य आहे. यामुळे या सेवा देण्याचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. हिताची एमजीआरएम नेटचा एमएसटीएआर प्लॅटफॉर्म हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे.आरोग्य सेवा देण्यातील अडचणी ओळखून सुलभरीत्या या सेवा देण्याची व्यवस्था यात विकसित करण्यात आली आहे. या भागीदारीमुळे राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक प्रगती होऊन त्या अधिक कार्यक्षम बनतील. 

8 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचा करार - 

जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'महाप्रित' आणि हिरो फ्युचर एनर्जी यांच्यात 8 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.  महाराष्ट्रात हरित आणि स्वच्छ ऊर्जेसाठी सोलर, कार्बन कॅप्चर, ग्रीन हायड्रोजन यासारख्या तंत्रज्ञानाचा अधिक सुलभतेने वापर करण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 'महाप्रित' चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे यांनी या करारावर स्वाक्षरी केली. 

40 हजार कोटींच्या करारावर स्वाक्षरी 

दावोस येथे सुरू असलेल्या 54 व्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'महाप्रित' आणि 'ग्रीन एनर्जी 3000' यांच्यात 40 हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारांतर्गत राज्यातील सौर ऊर्जा धोरणाला अनुसरून सौर ऊर्जा पार्क, पवन ऊर्जा, हायब्रीड पॉवर प्लांटस उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात एक हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असून ही क्षमता सोलर, हायब्रीड एनर्जी आणि बॅटरी एनर्जी स्टोरेजच्या सहाय्याने १० हजार मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.  'महाप्रित' चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Embed widget