Dasara Melava Uddhav Thackeray : पुनर्विकासाच्या मुद्यावर धारावीत सभा घेणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
Dasara Melava Uddhav Thackeray Speech : धारावीचा विकास (Dharavi Redevelopment) तुमच्या मित्राच्या खिशात जाणार असेन तर आम्ही ते होऊ देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
मुंबई : मागील काही महिन्यांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडून अदानी समूह (Adani Group) आणि उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांना लक्ष्य केले जात असताना आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील (Uddhav Thackeray) आता भाजपवर निशाणा साधला आहे. धारावीचा विकास (Dharavi Redevelopment) तुमच्या मित्राच्या खिशात जाणार असेन आणि धारावीकरांना काहीच मिळणार नसेल तर आम्ही ते होऊ देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात ते शिवसैनिकांना संबोधित करत होते.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात संबोधित करताना म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. त्याचा बदला म्हणून मुंबई, महाराष्ट्र लुटत आहेत. ह्यांना मुंबईला दिल्लीच्या दारात उभं करायचं आहे.. हा त्यांचा डाव असल्याचे उद्धव यांनी म्हटले. मुंबईला दुसऱ्या मार्गाने तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेच्या ऐवजी आता नीती आयोग मुंबईचा विकास करणार आहे. मुंबईता पालकमंत्री एका बिल्डरला केलं आहे. त्याचं ऑफिस मुंबई महापालिकेत आहे मुंबई बिल्डरांना देण्यासाठीचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
धारावीच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. हे धारावीदेखील गिळायला निघाले असल्याचा आरोप ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. धारावीच्या विषयावर मी बोलणार आहे. धारावीतच एक सभा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, धारावी विकासात अदानी समूहाला 150 कोटींचा एफएसआय मिळणार आहे. हा एफएसआय दक्षिण मुंबईत मिळणार. त्या ठिकाणी कोण येणार, हे समजून येतं. तुमच्या मित्राचा विकास होऊ देणार नाही. धारावीतील प्रत्येकाला घरे मिळाली पाहिजे, त्या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकाला गाळे मिळाले पाहिजे अशी मागणीदेखील त्यांनी केली. गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजे...वांद्रेतील शासकीय वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना घर मिळाली पाहिजे...त्यांना हे सरकार नकार देत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.
देशात लोकशाही राहणार की नाही?
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नाव न घेता टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने यांचे कानपट फोडले. तरी सकाळी उठून काही झालं नसल्यासारखं वागतात. एक लवाद जर सुप्रीम कोर्टाचे ऐकत नसेल तर देशात लोकशाही राहणार आहे की नाही, असा उद्गविन सवाल ठाकरे यांनी केला. भारत मातेची लोकशाही टिकणार की नाही ? 30 तारखेला बघू.. जनतेच्या न्यायालयात जाऊ द्या असं मी म्हणत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.